शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या वाढदिवसालाच आईची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:30 IST

रात्री मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन असतानाच आशा दिलीपकुमार नाथाणी (५०, रा. गायत्री नगर) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आली. दरम्यान, आशा यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमेहरुण तलावात आढळला मृतदेह   आत्महत्येचे गुढ कायम

जळगाव : रात्री मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन असतानाच आशा दिलीपकुमार नाथाणी (५०, रा. गायत्री नगर) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आली. दरम्यान, आशा यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसोली रस्त्यावरील गायत्रीनगरात दिलीपकुमार माणिकमल नाथाणी हे पत्नी आशा व मुलगा विवेक यांच्यासह वास्तव्यास आहेत. त्यांना दोन मुली असून त्या विवाहित आहेत. याचठिकाणी वरच्या मजल्यावर आशाबाई यांची बहिण मनिषा इंद्रकुमार नाथाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत.  दिलीपकुमार हे ज्या गावांचा आठवडे बाजार असतो, त्यादिवशी त्या गावांमध्ये कपडे विक्रीचे दुकान लावतात. शनिवारी ते बाहेरगावी होते तर मुलगा  विवेक हा  कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्याने आशा या एकट्याच घरी होत्या. दुपारी तीन वाजता मेहरुण तलावात त्यांचा मृतदेह तरंगत असतांना या परिसरातील गोपाळ कोळी, प्रशांत पाटील यांना दिसून आला. त्यांनी तत्काळ मेहरुण परिसरातील पट्टीचे पोहणारे समाधान नाईक, शरद वंजारी यांना  घटनास्थळी बोलावले. मृतदेह पाण्याच्याबाहेर काढून एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. उपनिरीक्षक विशाल वाठोरे, हवालदार सचिन मुंडे यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. डॉ.आकाश चौधरी यांनी त्यांना मृत घोषित केले.दरम्यान, रविवारी शवविच्छेदन होणार आहे. आशा यांनी आत्महत्या का केली याची माहिती नातेवाईक व पतीही सांगू शकले नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव