शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

खड्डयाला चुकविताना दुचाकी कोसळली अन् मागून ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:42 AM

महामार्गावर अपघात : अंगावर टायर गेल्याने कमरेपासून वेगळा झाला पाय; दुसरा विद्यार्थी जखमी

जळगाव : मित्राला सोबत घेऊन दुचाकीने शहराकडे येत असताना महामार्गावरील खड्डा चुकविण्यासाठी रस्त्याच्याखाली दुचाकी घेताना खराब साईडपट्टीमुळे दुचाकी कोसळली आणि त्यामुळे सौरभ गोपालदास मनवानी (१९, रा. हनुमान नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ) हा महामार्गावर पडला, त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्याला चिरडले व त्यात त्याचा जागेवरच अंत झाला. अपघात इतका भयंकर होता की, सौरभ याच्या कमरेपासून पाय वेगळा झाला. गुरुवारी दुपारी चार वाजता आहुजा नगराजवळ हा अपघात झाला. त्यात सौरभचा मित्र हर्षल शांताराम सपकाळे (१९,रा.बोदवड) हा जखमी झाला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ हा वडील गोपालदास आई, लक्ष्मी व लहान भाऊ स्वयंम यांच्यासोबत भुसावळ येथे वास्तव्यास होता. सौरभ हा बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हील इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वषार्ला शिक्षण घेत होता. त्यासाठी तो दुचाकीने भुसावळ येथून अपडाऊन करत होता. सौरभ गुरुवारीही सकाळी बांभोरी महाविद्यालयात आला होता. दुपारी महाविद्यालयातून निघाल्यावर दुचाकीने (एम.एच.१९ डी.के. ८३०३) भुसावळला घरी जाण्यासाठी निघाला. यावेळी वर्गातील हर्षल सपकाळे हा मित्र भेटला. हर्षलने सौरभला मलाही गावात यायचे आहे, असे सांगितले. यानंतर सौरभने त्याला दुचाकी चालवायचे सांगून तो मागे बसला.मुलाचा मृतदेह पाहताच वडील बेशुध्दअपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच महाविद्यालयाचे शिक्षक भागवत पाटील व विद्यार्थी सागर सोनवणे, पीयुष मन्यार, हर्षल सोमाणी, योगेश सोनवणे यांनी सौरभला जिल्हा रुग्णालयात हलविले. डॉ. कुरकुरे यांनी मृत घोषित केले. तर दुसरीकडे हर्षल सपकाळे हा जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. मानसिक धक्का बसू नये म्हणून त्याच्यापासून सौरभ मयत झाल्याची माहिती लपविण्यात आली होती. नातेवाईकांच्या माहितीनुसार सौरभचे वडील व आई यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. याठिकाणी सौरभचा पाय व शरीर वेगळा झालेला मृतदेह पाहताच सौरभची आईसह लहान भावाने हंबरडा फोडला तर वडील बेशुध्द पडले. लोकांनी त्यांच्या तोंडावर पाणी मारले तेव्हा काही वेळाने ते शुध्दीवर आले मात्र त्यांचे भान हरपले होते.मुख्यमंत्र्यांचा दौरा, रस्त्याची डागडुजी अन् सौरभचा बळीमुख्यमंत्री शुक्रवारी जिल्हा दौºयावर असल्यामुळे महामार्गावर गुरुवारी खड्डे बुजविण्याचे तसेच मलमपट्टी करण्याचे काम सुरु होती. अनेक वषार्पासून खड्डे असलेल्या महामार्गाच्या किमान खड्डयाचे भाग्य उजळले होते. महामार्गावरील सुरु असलेल्या कामासाठी वाहने थांबविण्यात येत होती. पुढे आहुजा नगराजवळ सौरभने रस्त्यावरील खड्डा चुकविण्यासाठी दुचाकी साईडपट्टीवर घेतली, मात्र त्यात पाणी साचल्याने मोठा खड्डा होता. त्यामुळे दुचाकी कोसळली अन् सौरभ महामार्गाच्या दिशेने तर हर्षल विरुध्द दिशेने पडला. सौरभ महामार्गावर पडल्याने मागून भरधाव येत असलेल्या ट्रकने महामार्गावर पडलेल्या सौरभला चिरडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव