मराठा इन्फ्रंटी बटालियनच्या शहीद जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 12:50 IST2021-02-02T12:50:02+5:302021-02-02T12:50:34+5:30

Martryred : तालुक्यातील तांबोळे बुद्रक येथील सुपुत्र सागर रामा धनगर (२७) हे  सेनापती  (मणिपूर) येथे  झालेल्या हल्ल्यात शहीद झाले. ही घटना ३१ रोजी पहाटे दोन वाजता घडली.

Martyrs of Maratha Infantry Battalion soldier funeral in jalgaon | मराठा इन्फ्रंटी बटालियनच्या शहीद जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मराठा इन्फ्रंटी बटालियनच्या शहीद जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ठळक मुद्देसागर धनगर हे नोव्हेंबर २०१७  मध्ये ५, मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये रुजू झाले होते. सागर यांचे पार्थिव १  रोजी दुपारी २ वाजता इंम्फाळ (मणिपूर) येथून गुवाहाटी (आसाम) येथे आणण्यात आले.

चाळीसगाव जि.जळगाव  :  मणिपुरात  शहीद झालेले जवान सागर  धनगर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी तांबोळा ता. चाळीसगाव येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. तालुक्यातील तांबोळे बुद्रक येथील सुपुत्र सागर रामा धनगर (२७) हे  सेनापती  (मणिपूर) येथे  झालेल्या हल्ल्यात शहीद झाले. ही घटना ३१ रोजी पहाटे दोन वाजता घडली.

आष्टी तालुक्यातील वीर जवान शरद चांदगुडे अनंतात विलीन

सागर धनगर हे नोव्हेंबर २०१७  मध्ये ५, मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये रुजू झाले होते. सागर यांचे पार्थिव १  रोजी दुपारी २ वाजता इंम्फाळ (मणिपूर) येथून गुवाहाटी (आसाम) येथे आणण्यात आले. तेथून ते  मुंबई येथील विमानतळावरसांयकाळी ७.१५  वा. पोहचले. त्यांनतर ते मंगळवार, २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुळगावी आणण्यात आले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त  झाली आहे.

Web Title: Martyrs of Maratha Infantry Battalion soldier funeral in jalgaon