गावात जाऊन येतो म्हणाला, रेल्वेच्या धक्क्याने जीव गमावला

By विलास बारी | Updated: March 21, 2024 22:13 IST2024-03-21T22:12:55+5:302024-03-21T22:13:05+5:30

नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

man died after falling from train in jalgaon | गावात जाऊन येतो म्हणाला, रेल्वेच्या धक्क्याने जीव गमावला

गावात जाऊन येतो म्हणाला, रेल्वेच्या धक्क्याने जीव गमावला

जळगाव : धावत्या रेल्वेखाली आल्याने भादली येथील २७ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नशिराबाद ते तरसोद फाट्याजवळ गुरूवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. देवेंद्र रामकृष्ण कोल्हे (वय २७ रा. भादली ता.जि.जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे.

देवेंद्र कोल्हे हा तरूण आपल्या आई, वडील, पत्नी आणि दोन मुलांसह भादली येथे वास्तव्याला होता. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. बुधवारी सायंकाळी ७ वाजता गावात जावून येतो असे सांगून देवेंद्र हा घरातून निघून गेला होता. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने गुरूवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नशिराबाद ते तरसोद रेल्वे फाट्यादरम्यानच्या रेल्वे रूळावर त्याचा मृतदेह आढळून आला. मयत तरूणाच्या पश्चात आई,वडील, पत्नी कोमल आणि दोन मुलं असा परिवार आहे.

Web Title: man died after falling from train in jalgaon