शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:01 IST

ऊस उत्पादक, कामगार, मजूर यांची देणी तसेच कारखान्यासमोर असलेल्या आर्थिक अडचणी यातून मार्ग काढण्यासाठी तसेच कारखाना अखंडपणे सुरू राहावा याकरिता तो भाडेतत्त्वावर देण्याच्या चर्चेसाठी सोमवारी मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण सभा चेअरमन शरद महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली

ठळक मुद्देसंचालक मंडळाच्या बैठकीत चर्चायोग्य प्रस्ताव आल्यास सर्वसाधारण सभेची घेणार मंजुरी

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : ऊस उत्पादक, कामगार, मजूर यांची देणी तसेच कारखान्यासमोर असलेल्या आर्थिक अडचणी यातून मार्ग काढण्यासाठी तसेच कारखाना अखंडपणे सुरू राहावा याकरिता तो भाडेतत्त्वावर देण्याच्या चर्चेसाठी सोमवारी मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण सभा चेअरमन शरद महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलीयावेळी सर्वसाधारण सभेची मंजुरी व त्यानंतर योग्य प्रस्ताव आल्यास 'मधुकर' भाडेतत्वावर देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.मधुकर सहकारी साखर कारखाना सद्य:स्थितीत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गाक्रमण करीत आहे. त्यात सन २०१८/१९ मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम, कामगारांचे वेतन, ऊसतोडणी वाहतूकदार यांचे पेमेंट आर्थिक अडचणींमुळे अदा करता आलेले नाही. त्यात सन २०१९/२० साठी एक हजार हेक्टर उसाची उपलब्धता कारखाना कार्यक्षेत्रात आहे. त्यात मागील देणी बाकी असल्याने तसेच हंगाम सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य नसल्याने गाळप हंगाम सुरू करणे कठीण आहे. या सर्व बाबींचा विचारविनिमय या बैठकीत करण्यात आला.तसेच गाळप हंगाम २०१९/२० सुरू न झाल्यास नोंदणी केलेल्या ऊस उत्पादकांचे, कामगारांचे, तोडणी वाहतूक, ठेकेदार तसेच सर्व संबंधित घटक यांचे फार मोठे नुकसान होऊ शकते. यासाठी साखर आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकाच्या निर्देशानुसार कारखाना भाडेतत्त्वावर, सहयोग तत्वावर अथवा भागीदारी तत्वावर देणे बाबतची चर्चा या सभेत करण्यात आली. यावेळी सभेत कारखाना भाडेतत्त्वावर द्यायचा असल्यास सर्वप्रथम कारखान्याशी संबंधित सर्व लोकप्रतिनिधींची व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यात येईल. त्यानंतर सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन कारखाना चालवण्यासाठी योग्य प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करण्यात येईल, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या ४० वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘मधुकर’ला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी व मधुकर यापुढे अखंड सुरू राहावा यासाठी भाडेतत्त्वावर देण्यात यावा या विषयासह अन्ययही विषयांवर गंभीरपणे चर्चा झाली. संचालक मंडळाच्या या सभेला व्हाईस चेअरमन भागवत पाटील, कार्यकारी संचालक एस.आर.पिसाळ व सर्व संचालक उपस्थित होते‘मधुकर’ अखंडपणे सुरू राहावा ही सर्व संचालक मंडळाची मनापासूनची इच्छा आहे. मात्र सध्या कारखान्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सर्वांचीच देणी थकलेली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. भाडे तत्त्वाचा योग्य प्रस्ताव आल्यास, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन त्या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यात येईल.-शरद महाजन, चेअरमन, मधुकर सहकारी साखर कारखाना