शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

‘लोकमत’ने घडवली गुरू-शिष्याची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 19:17 IST

‘लोकमत’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरू संत सखाराम महाराज यांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज व शिष्य मोहन बेलापूरकर महाराज यांची भेट घडवून अडीचशे वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.

ठळक मुद्दे संत सखाराम महाराज यात्रोत्सव सोशल मीडियातून प्रसाद महाराज व बेलापूरकर महाराजांची भेट

अमळनेर, जि.जळगाव : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेरच्या संत सखाराम महाराजांच्या यात्रेवर कोरोनामुळे विरजण पडले आहे. ‘लोकमत’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरू संत सखाराम महाराज यांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज व शिष्य मोहन बेलापूरकर महाराज यांची भेट घडवून अडीचशे वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. दोन्ही संतांनी ‘लोकमत’चे आभार मानले.वैशाख महिन्यात अमळनेरला बोरी नदीच्या वाळवंटात मोठा यात्रोत्सव साजरा होत असतो. एकादशीला रथोत्सव मिरवणूक होते. त्यावेळी राज्यातून दोन ते अडीच लाख भाविक अमळनेरात येत असतात. यंदा रथोत्सव ४ रोजी होणार होता. परंपरेप्रमाणे वैशाख मध्ये पांडुरंगाचे वास्तव्य अमळनेरला असते म्हणून संत सखाराम महाराजांचे शिष्य बेलापूरकर महाराज अमलनेरला येत असतात आणि गुरू शिष्याला वेशीवर जाऊन त्यांचे स्वागत करण्याची अडीचशे वर्षांची परंपरा आहे. ३ रोजी बेलापूरकर महाराज अमळनेर येणार होते. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने मोहन बेलापूरकर महाराज अमळनेर येऊ शकत नाहीत व अमळणेरचे वाडी संस्थान कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने प्रसाद महाराज बाहेर येऊ शकत नाही म्हणून ही परंपरा खंडित होण्याची भीती होती. गुरू शिष्याच्या भेटीचा हा सोहळा भक्त पाहू शकत नसले तरी ‘लोकमत’चे फोटोग्राफर महेंद्र पाटील आणि तालुका प्रतिनिधी संजय पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघं गुरू शिष्यांची भेट घडवून आणली. दोघा संतांनी परंपरा खंडित होऊ दिली नाही. म्हणून ‘लोकमत’चे आभार मानले आहेत आणि दोघांनी संपूर्ण महाराष्ट्र कोरोना मुक्त व्हावा, अशी प्रार्थना पांडुरंगाला केली आहे.रथाच्या आदल्या दिवशी ३०० कि.मी. अंतरावरून मोहन बेलापूरकर महाराज वेशीवर आल्यानंतर गुरू प्रसाद महाराज त्यांचे आर.के.नगर भागात जाऊन स्वागत करतात. तेथून शिग्राममध्ये दोन्ही गुरू शिष्य यांना बसवून मिरवणूक काढली जाते. ठिकठिकाणी रांगोळी, पान सुपारीने स्वागत केले जाते. नंतर दिंडी तुळशी बागेत जाते. त्या दिवसापासून वाडी मंदिरात देवासमोर दररोज बेलापूरकर महाराज कीर्तन करीत असतात. संत सखाराम महाराजांची पुण्यतिथी साजरी करतात. द्वादशीला अम्बरशी टेकडीवर जात असतात व पालखीनंतर दुसºया दिवशी काल्याच्या किर्तनाने सांगता करतात.यंदा मात्र मंदिरात दररोज भजन होणार आहे. ४ रोजी एकादशीला रथ मिरवणूक होणार नाही. रथ धुवून घेतला असून, लालजी व देवांची मूर्ती पूजा करून बाहेर काढून रथाभोवती प्रदक्षिणा घालून शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे.-हभप प्रसाद महाराज, सखाराम महाराजांचे अकरावे गादी पुरुष,अमळनेरपंढरपूर येथे संत सखाराम महाराजांच्या संस्थांमध्ये पुण्यतिथी साजरी करून आठ दिवस दररोज तेथेच कीर्तन होऊन काल्याच्या कीर्तनाने सांगता केली जाईल.-मोहन महाराज बेलापूरकर (संत सखाराम महाराजांचे वारसदार शिष्य)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमAmalnerअमळनेर