शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे आरटीई प्रवेशप्रक्रिया लांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई शैक्षणिक वर्षासाठीच्या २५ टक्के जागांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची लॉटरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई शैक्षणिक वर्षासाठीच्या २५ टक्के जागांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची लॉटरी नुकतीच जाहीर झाली. मात्र, लॉकडाऊनमुळे कागदपत्रे पडताळणी करू नये, असा आदेश असल्याने प्रवेशप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. अजूनही ही प्रक्रिया प्रारंभ न झाल्यामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

आरटीई प्रवेशाच्या आशेवर असणारे पालक यंदा उशिरा सुरू होत असलेल्या प्रवेशप्रक्रियेमुळे हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी सुद्धादेखील लॉटरी जाहीर झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे कागदपत्र पडताळणी करण्यास विलंब झाला होता. लॉकडाऊन वाढल्याने कागदपत्र पडताळणीचा अधिकार शाळांकडे देण्यात आला. मात्र, शाळांनी कागदपत्र पडताळणी सुरुवातीला विरोध दर्शविला. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेस विलंब लागला. त्याचीच पुनरावृत्ती यंदा होत आहे. १५ एप्रिल रोजी पालकांना एसएमएस पाठविण्‍यात आले आहे. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. प्रक्रिया थांबून २० दिवस उलटले आहे. मात्र, अद्याप कुठल्याही सूचना देण्‍यात आलेल्या नाही. लॉकडाऊन संपल्यावर आवश्यक सूचना केल्या जातील, असे संकेतस्थळावर दर्शविण्यात आले आहे.

२ हजार ६९५ विद्यार्थ्यांना लॉटरी

७ एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली होती. नंतर १५ एप्रिलला प्रथम यादी जाहीर करण्‍यात आली. त्यात २ हजार ६९५ विद्यार्थ्यांना लॉटरी लागली. पण, अद्याप या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश निश्चित करता आलेले नाही. यंदा २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया लांबत राहिली, तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना कधी प्रवेश मिळणार? असा सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे.