दुचाकींनंतर आता पशुधनाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST2021-06-04T04:13:39+5:302021-06-04T04:13:39+5:30

भडगाव : भडगाव परिसरात चोरीचे सत्र थांबण्यास तयार नाही. चोवीस तासात तीन मोटारसायकली व चार गाई चोरट्यांनी चोरुन ...

Livestock theft now after bikes | दुचाकींनंतर आता पशुधनाची चोरी

दुचाकींनंतर आता पशुधनाची चोरी

भडगाव : भडगाव परिसरात चोरीचे सत्र थांबण्यास तयार नाही. चोवीस तासात तीन मोटारसायकली व चार गाई चोरट्यांनी चोरुन नेल्या आहेत. यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.

कजगाव-चाळीसगाव या मुख्य मार्गावरील भोरटेक, ता. भडगाव येथील माजी उपसरपंच सुनील महाजन यांच्या घराच्या कम्पाऊंडमधून ३ रोजी पहाटे दोन गाई तसेच शेजारीच महाजन यांचे चुलत भाऊ नितीन महाजन यांच्या शेडमधून दोन गाई अशा चार गाई अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याअगोदर दीड ते दोन महिन्यापूर्वीदेखील महाजन यांच्या याच शेडमधून तीन गाई चोरीस गेल्या होत्या. १ रोजी अर्जुन वाल्मीक पाटील यांची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. मात्र पेट्रोल संपल्यामुळे ती कजगावजवळ रस्त्यात सोडत तेथून पोबारा केला होता.

Web Title: Livestock theft now after bikes