प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात लिंबू राक्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 21:41 IST2019-11-11T21:40:06+5:302019-11-11T21:41:24+5:30
प्राणघातक हल्ला प्रकरणात राकेश चंद्रकांत साळुंखे (कोळी) उर्फ लिंबू राक्या (२३रा. कांचननगर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली. सोमवारी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात लिंबू राक्याला अटक
जळगाव : प्राणघातक हल्ला प्रकरणात राकेश चंद्रकांत साळुंखे (कोळी) उर्फ लिंबू राक्या (२३रा. कांचननगर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केली. सोमवारी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
१६ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास गणेश सोनार हा त्याचे मित्र जगदीश सुकलाल भोई रा. कोळीपेठ व विष्णु गोविंद प्रजापती यांच्यासह गांधी उद्यानाकडून पांडे चौकाकडे पायी जात असताना रस्त्यात राकेश कोळी उर्फ लिंबू राक्या गाडीवर थांबलेला होता. राक्याने जात असलेल्या गणेशला उद्देशून तु दादा झाला आहे का? असे म्हणत कानशिलात लगावली तसेच तुला संपवून टाकेन असे म्हणत त्याच्यावर चाकून वार केला. गणेशला सोडविण्यासाठी विष्णू मध्ये पडला असता त्याच्यावरही लिंबू राक्याने वार केले. यानंतर भितीने विष्णु व जगदीश पळून गेले. याप्रकरणी गणेश सोनार यांच्या फिर्यानीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात लिंबू राक्या विरोधात प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
सरकार पंचाचा खेळाचा आरोपीला फटका
लिंबू राक्याला पोलिसांनी ९ रोजी रात्री ११.४५ वाजता अटक केली. दरम्यान, गुन्ह्याचे स्वरुप पाहता यात मेमोरंडम पंचनामा हा सरकारी पंचासमक्ष करणे आवश्यक आहे. १० रोजी रविवार असल्याने पंच मिळाले नाही, सोमवारी पंच मिळणेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग यांना पत्र देण्यात आले.मात्र त्यांनी पत्र न घेता पंच देण्यास नकार दिला, भुमीअभिलेख कार्यालय, उपअधीक्षक यांना पत्र देण्यात आले. त्यांनी सोमवार दुपारी उशीरा एक पंच दिल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. हत्यार जप्त करुन पंचनामा करणेकामी पुरेसा वेळ मिळाला नाही, असेही न्यायालयाला सांगितले. पंचाअभावी आरोपीला एक दिवस उशिराने न्यायालयात हजर करण्यात आले.