पुस्तक भिशी उपक्रमात चंद्रकांत भंडारी यांचे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:36+5:302021-09-07T04:21:36+5:30

डॉ. अब्दुल कलाम पुस्तक भिशी ऑनलाइन व्याख्यानात चंद्रकांत भंडारी यांचे प्रतिपादन जळगाव : भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी ...

Lecture by Chandrakant Bhandari in the book Bhishi Upakrama | पुस्तक भिशी उपक्रमात चंद्रकांत भंडारी यांचे व्याख्यान

पुस्तक भिशी उपक्रमात चंद्रकांत भंडारी यांचे व्याख्यान

डॉ. अब्दुल कलाम पुस्तक भिशी ऑनलाइन व्याख्यानात चंद्रकांत भंडारी यांचे प्रतिपादन

जळगाव : भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव आयोजित ऑनलाइन व्याख्यान साहित्यिक चंद्रकांत भंडारी यांच्या उपस्थितीत ५ रोजी झाले. ‘शिक्षकांनी काय वाचावं? विद्यार्थ्यांपर्यंत ते कस पोहोचवावं’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

चंद्रकांत भंडारी यांनी मुंबईच्या लोकल प्रवासात जपलेलं पुस्तक वाचन वेड आणि हायस्कूलमध्ये साहित्यिक पु.ल. देशपांडे, भालचंद्र नेमाडे, शांता शेळके, शिरीष पै, हरिवंशराय बच्चन यांच्याशी विद्यार्थ्यांशी भेट, प्रत्यक्ष वर्गात अध्यापन आणि सुसंवाद अशा अनोख्या प्रयोगातील गंमती जमतीसह किस्से सांगितले.

प्रारंभी पुस्तक भिशी उपक्रमाचे जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी परिचय करून दिला. आभार प्रदर्शन तंत्रस्नेही कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी केले. व्याख्यानास अंनिस ज्येष्ठ कार्यकर्ते डिगंबर कट्यारे व शिरीष चौधरी, सुप्रसिद्ध लेखक राजेंद्र पारे, डायेटचे किशोर पाटील, हर्षवर्धन भंडारी, सुनीता भंडारी, डॉ.विजय बागुल, उषा सोनार, गजश्री पाटील, सुजाता निकम, वंदना वानखेडे, अरुण पाटील, श्रीकांत मोटे, अथर्व गुरव, बाळू पाटील यांच्यासह ग्रंथप्रेमी शिक्षक व रसिकांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.

Web Title: Lecture by Chandrakant Bhandari in the book Bhishi Upakrama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.