शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

भाजीपाल्याचे स्टॉल सोडून जेव्हा विक्रेते पळतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 8:46 PM

पोलिस आल्याच्या अफवेने पळापळ : काहीजण जखमी, झेंडे चौकात थाटली होती दुकाने

शिरसोली : शिरसोली येथे बाजार बंद असल्याने गल्लीत भरलेल्या बाजारात पोलीस आल्याची अफवा पसरल्याने ग्राहक व विक्रेत्यांची चांगलीच धांदल उडाली. यावेळी दुकाने सोडुन पळापळ झाल्याने यात अनेक जण किरकोळ जखमी झाले. अफवा असल्याचे समजताच बाजार पुन्हा सुरु झाला.शिरसोली प्र. बो. येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरत असतो. परंतु कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन आजार पसरु नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शिरसोलीत बुधवारचा भरणारा दुसरा बाजार बंद ठेवण्यात आला होता.बाजार बंद असल्याने भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाल्याची दुकाने शिरसोलीतील झेंडे चौकात थाटली होती. बाजारात ग्राहक व विक्रेत्यांची चांगली गर्दी झाली असताना कुणी तरी पोलीस आल्याची अफवा पसरवली आणि काही सेकंदात भाजीपाल्याची दुकाने सोडुन हातात मिळेल, ते साहित्य घेवून जागा मिळेल तिकडे पळत सुटले.यावेळी झालेल्यस चेंगराचेंगरीत कुणी खाली पडले तर कुणाला किरकोळ मार लागून जखमी झाले. नंतर काही वेळाने अफवा असल्याचे समजताच बाजार पुन्हा ‘जैसे थे’ सुरु झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव