जळगावमध्ये बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर भीषण अपघात, 10 जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 12:16 IST2020-02-03T08:09:46+5:302020-02-03T12:16:55+5:30

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रविवारी मध्यरात्री डंपर आणि क्रुझर यांच्यात भीषण अपघात झाला.

At least 10 people were killed in a road accident on the burhanpur ankleshwar national highway | जळगावमध्ये बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर भीषण अपघात, 10 जण ठार

जळगावमध्ये बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर भीषण अपघात, 10 जण ठार

जळगाव -  यावल तालुक्यात हिंगोणाजवळ बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर डंपर आणि क्रुझर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण ठार झाले असून 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. 

मिळालेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यात हिंगोणाजवळ बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रविवारी मध्यरात्री डंपर आणि क्रुझर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात क्रुझरमधील 10 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले आहेत. हे प्रवासी चोपडा येथून स्वागत समारंभ आटोपून येत असताना हा अपघात झाला. हे सर्व प्रवासी एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येते.  

प्रभाबाई प्रभाकर चौधरी (45), सोनाली जितेंद्र चौधरी (35) सोनल सचिन महाजन (37), गंगाबाई ज्ञानेश्‍वर चौधरी (35) उमेश चौधरी (28) प्रभाकर नारायण चौधरी (63) प्रिया जितेंद्र चौधरी (10) प्रियंका नितीन चौधरी (25) सुमनबाई श्रीराम पाटील (60) संगीता मुकेश पाटील (33) अशी अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर, सर्वेश नितीन चौधरी,  शंतनू मुकेश पाटील, अंवी नितीन चौधरी, मीना प्रफुल्ल चौधरी, सुनिता राजाराम चौधरी, आदिती मुकेश पाटील आणि शिवम प्रभाकर चौधरी हे जखमी झाले आहेत. 

दरम्यान, या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

Web Title: At least 10 people were killed in a road accident on the burhanpur ankleshwar national highway