तलाठी महिलेसह पतीच्या हत्येचा कोतवालानेच रचला कट, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:26 IST2025-06-18T15:24:29+5:302025-06-18T15:26:32+5:30

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यात एका कोतवालाने तलाठी महिलेसह तिचा आणि कुटुंबाची हत्या करण्याचा कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Kotwala himself hatched a conspiracy to murder Talathi woman and her husband, shocking incident in Jalgaon district | तलाठी महिलेसह पतीच्या हत्येचा कोतवालानेच रचला कट, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना 

तलाठी महिलेसह पतीच्या हत्येचा कोतवालानेच रचला कट, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना 

जळगाव तालुक्यातील सोनाळे (ता. जामनेर) येथील महिला तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) कीर्ती रमेशराव निघोट यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचा हत्येचा कट रचणाऱ्या आणि घाणेरड्या भाषेत मोबाइलवरून संवाद साधणाऱ्या कोतवालावर निलंबनाची तलवार कोसळली आहे. अमोल विकास निकम असे या कोतवालाचे नाव आहे.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कीर्ती निघोट यांनी जामनेर पोलिसात १४ जून रोजी फिर्याद देखील दाखल केली आहे. तसेच वरिष्ठांनाही तक्रारी अर्ज सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. 

त्याअनुषंगाने तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी केलेल्या चौकशीत कोतवाल दोषी आढळल्याने त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात कोतवाल निकम यांना जामनेर मुख्यालयात सेवा बजवावी लागणार आहे. तसेच तहसीलदारांच्य पूर्वपरवानगीशिवाय त्यांना जामनेर मुख्यालय सोडता येणार नाही.

असे आहेत आरोप

तलाठी किर्ती निघोट यांना मानसिक त्रास होईल, यादृष्टीने शासकीय प्रणाली ताब्यात घेण्याचा केला प्रयत्न केला. कोतवाल अमोल निकम यांनी काही साथीदारांच्या मदतीने निघोट व त्यांच्या पतीचा हत्येचा कट रचल्याचे स्पष्ट.

प्रशासकीय शिस्त मोडीत काढत १९७९ मधील कलम ३ चा केला भंग जामनेर पोलिसात कोतवालाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने प्रशासनाची प्रतिमा मलीन केली. 

Web Title: Kotwala himself hatched a conspiracy to murder Talathi woman and her husband, shocking incident in Jalgaon district