बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे शिक्षिकेवर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 12:49 IST2019-06-19T12:39:12+5:302019-06-19T12:49:57+5:30
हल्लेखोर शिक्षकाने स्वत:वरही करून घेतले चाकूने वार

बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे शिक्षिकेवर चाकू हल्ला
बोडवड, जि. जळगाव : बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाने शिक्षिकेवर चाकूने हल्ला करीत स्वत:वरदेखील वार करून घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. जखमी अवस्थेत दोघांनाही जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शिक्षक कपूरचंद एकनाथ पाटील यांनी संस्थेतीलच शिक्षिका चंदा घरकर यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यानंतर पाटील यांनी स्वत:वरदेखील वार करून घेतले. यात दोघेही जखमी झाले असून ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले.