शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
6
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
7
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
8
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
9
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
10
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
11
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
12
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
13
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
14
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
15
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
16
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
17
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
18
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
19
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

खुन्याला दोन दिवस तर बलात्काऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:34 IST

अमळनेर : मित्राचा गळा कापून खून करणाऱ्या आरोपीस पुन्हा दोन दिवसांची तर अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या बलात्काऱ्यास तीन दिवसांची ...

अमळनेर : मित्राचा गळा कापून खून करणाऱ्या आरोपीस पुन्हा दोन दिवसांची तर अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या बलात्काऱ्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

खून करणाऱ्या कैलास शिंगाणे याची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्याला अमळनेर येथील न्या. अग्रवाल यांच्या कोर्टात हजर केले असता त्याला १ सप्टेंबरपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून त्याचा व मयताचा मोबाईल, चाकू व मोटरसायकल जप्त केले आहे.

तसेच बसस्थानकावरून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील गोपीचंद पवार याच्याविरुद्ध मुलीच्या जबाबावरून बालकांचा लैंगिक अत्याचार विरोधी कायदा २०१२च्या कलम ४, ८, १२ प्रमाणे पोक्सोचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याला पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्या. व्ही. आर. जोशी यांनी आरोपीला २ सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

खुनातील आरोपी कैलास शिंगाणे याच्याकडून मोटरसायकल, चाकू, मोबाईल जप्त करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, एपीआय राकेशसिंग परदेशी, सुनील हटकर, राहुल पाटील, किशोर पाटील उपस्थित होते.