किडनीदात्यांचा जिल्हाधिकाऱ्यांहस्ते सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:28 IST2020-12-03T04:28:03+5:302020-12-03T04:28:03+5:30

फोटो आहे ... जळगाव : राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त किडनी दात्यांचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या ...

Kidney donors felicitated by District Collector | किडनीदात्यांचा जिल्हाधिकाऱ्यांहस्ते सत्कार

किडनीदात्यांचा जिल्हाधिकाऱ्यांहस्ते सत्कार

फोटो आहे ...

जळगाव : राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त किडनी दात्यांचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी अवयवदान चळवळीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी लक्ष वेधण्यासह अवयवदान चळवळीस गती मिळण्याची मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी नीलिमा अहिरराव व विमल जोशी या किडनीदात्यांचा जिल्हाधिकारी राऊत यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या अवयवदान प्रतिज्ञा प्रतिमेचे यावेळी अनावरण करण्यात आले. डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर सूर्यवंशी, डॉ. अमित भंगाळे, डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी अवयवदान मोहिमेस गती येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले. मुसा शेख यांनी आभार मानले. (वा.प्र.)

फोटो कॅप्शन- जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना अवयवदान प्रतिज्ञा देताना डावीकडून डॉ.धर्मेंद्र पाटील, मुसा शेख, किशोर सूर्यवंशी, डॉ.नरेंद्र ठाकूर, डॉ.अमित भंगाळे.

Web Title: Kidney donors felicitated by District Collector