खडसे बुधवारी ईडी कार्यालयात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 01:15 IST2020-12-27T01:15:48+5:302020-12-27T01:15:52+5:30

चौकशीत आपण सर्व सहकार्य करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी माध्यमांना दिली.

Khadse will go to the ED office on Wednesday | खडसे बुधवारी ईडी कार्यालयात जाणार

खडसे बुधवारी ईडी कार्यालयात जाणार

जळगाव : भोसरी येथील भूखंड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय(ईडी)कडून शनिवारी आपल्याला नोटीस प्राप्त झाली आहे. ३० डिसेंबरला मुंबईतील ईडी कार्यालयात बोलाविण्यात आले असून चौकशीत आपण सर्व सहकार्य करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी माध्यमांना दिली. या प्रकरणात ही पाचवी चौकशी असल्याचे त्यांनी सांगितले. भोसरी येथील भूखंड हा पत्नी मंदाकिनी यांनी खरेदी केला असून एकत्रित कुटुंब म्हणून कदाचित माझ्या नावाने ही नोटीस आली असेल, असेही खडसे म्हणाले. 

Web Title: Khadse will go to the ED office on Wednesday