कौतिक नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST2021-04-04T04:17:20+5:302021-04-04T04:17:20+5:30

-- कौतिक नाईक शिरसोली : माजी सरपंच कौतिक नाईक (बारी) (७२) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, ...

Kautik Naik | कौतिक नाईक

कौतिक नाईक

--

कौतिक नाईक

शिरसोली : माजी सरपंच कौतिक नाईक (बारी) (७२) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते किरण बारी यांचे वडील होत.

--

पांडुरंग पाटील

जळगाव : आव्हाणे येथील वृत्तपत्र विक्रेते पांडुरंग पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे.

--

युसूफ खान

जळगाव : निवृत्त एसटी चालक युसूफ खान रहेमान खान यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अज्जू बावा यांचे ते वडील होत.

--

अनुसयाबाई जगताप

जळगाव : अनुसयाबाई जगताप (९२, रा. हाउसिंग सोसायटी) यांचे शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र जगताप यांच्या त्या आई होत.

--

झरीना लेहरी

जळगाव : झरीना शब्बीर हुसेन लेहरी (६०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. मुफद्दलभाई लेहरी यांच्या त्या आई होत.

--

शालिनी मोराणकर

जळगाव : शालिनी मोराणकर (७४) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. नितीन मोराणकर यांच्या त्या आई होत.

--

रामदास वाघ

जळगाव : रामदास वाघ (८६, रा. दत्त कॉलनी, शाहूनगर) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. चंद्रशेखर वाघ यांचे ते वडील होत.

--

दिलीप राणे

जळगाव : दिलीप राणे (६१, रा. कोल्हेनगर) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन भाऊ, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

--

शकुंतला दहाड

जळगाव : शकुंतला दहाड (८०, रा. गिरणाटाकी परिसर) यांचे हृदयविकाराने निधन झाले. राजमल दहाड यांच्या त्या वहिनी होत.

--

तुषार चौधरी

जळगाव : तुषार चौधरी (४०, रा. राधाकिसन वाडी) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. म.न.पा. शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका विजया चौधरी यांचे ते पुत्र होत.

--

देवीदास पाटील

जळगाव : देवीदास पाटील (८४) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवार, ४ एप्रिल रोजी सकाळी निघेल. चंद्रकांत पाटील यांचे ते वडील होत.

--

रामकृष्ण चौधरी

जळगाव : रामकृष्ण चौधरी (९१, रा. आसोदा) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक कमलाकर चौधरी यांचे ते वडील होत.

--

यादव आमोदकर

जळगाव : यादव आमोदकर (७६, रा. आमोदा, ता. यावल) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी ९ वाजता निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्ञानदेव आमोदकर यांचे ते वडील होत.

---

Web Title: Kautik Naik