जुलैपर्यंत २०० शाळा होतील सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:29 PM2020-05-23T12:29:30+5:302020-05-23T12:29:50+5:30

संरक्षण भिंतीची कामे प्रगतीपथावर : व्हॉट्स अ‍ॅपग्रुपवर रोज आढावा

By July, 200 schools will be safe | जुलैपर्यंत २०० शाळा होतील सुरक्षित

जुलैपर्यंत २०० शाळा होतील सुरक्षित

Next

जळगाव : मनरेगा अंतर्गत जिल्हाभरातील ५९३ शाळांना मंजुरी मिळाली असून यातील २०० ते ३०० शाळांच्या संरक्षण भिंतीची कामे जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पूर्ण होतील, असे नियोजन शिक्षण विभागाकडून सुरू आहे़ यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅपग्रुपवर नियमित या कामांचा आढावा घेतला जात आहे़
जिल्हाभरात शाळांच्या संरक्षण भिंतीचा मुद्दा काही महिन्यांपूर्वी समोर आला होता़ जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी निधीच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळी शिक्षण व आरोग्यासाठी पुरेसा निधी देण्याची हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती़ त्यानुसार मनरेगा अंतर्गत जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ़बी़एऩपाटील यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हाभरातील ५९३ शाळांच्या संरक्षण भिंतीची कामे मंजूर करण्यात आली होती़ कामांना प्रशासकीय, तांत्रिक मान्यता मिळविण्यात आल्या़ मार्च अखेरीसल लॉकडाऊन जाहीर मात्र, अशा परिस्थितीतही कामे सुरू ठेवण्याचे आदेश असल्याने कामे सुरू राहिली़ अनेक कामे प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्णत्वास येण्याचा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला आहे़
एरंडोलला तीन कामे पूर्ण
मार्च महिन्यात कासोदा ता़ एरंडोल येथे जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे, सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांच्यासह अधिकाºयांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजन झाले होते़ दोन महिन्यात भिंतीचे काम पूर्ण झाले आहे़ यासह तालुक्यातील अन्य तीन कामेही पूर्ण झाली असून पंधरा कामे प्रगतीपथावर आहेत़

मिशन ३०० स्कूल
मिशन ३०० स्कूल कॉम्पाऊंड या नावाने शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला असून या ग्रुपवर नियमित कामांचा आढावा, कामांचे फोटो, सद्यस्थिती यांची माहिती प्रत्येक गटविकास अधिकारी स्तरावरून अपलोड केली जाते़ सीईओ डॉ़बी़एऩपाटील हे नियमित आढावा घेत असून जुलै पर्यंत ३०० शाळांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली़

Web Title: By July, 200 schools will be safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.