शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

बालिकेच्या विनयभंगानंतर जामनेरला तणाव, पोलीस वाहनांवर दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 22:33 IST

जमावाची पोलीस वाहनावर दगडफेक, पोलिसांचा लाठीमार

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हफीज बेग मेहमुद बेग (५२, रा.घरकुल परिसर, जामनेर) याने पिडीतेस त्याचे घरात पलंगाखाली लपवून ठेवत विनयभंग केला.

जामनेर :  बालिकेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शुक्रवारी जामनेरात घडली. या आरोपीला पकडून जमावाने मारहाण केली.  आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी  जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली.  या संतप्त जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील घरकुल परिसरात  घडली. या घटनेनंतर या भागात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलीस ठाण्यातदेखील गर्दी झाली होती.      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हफीज बेग मेहमुद बेग (५२, रा.घरकुल परिसर, जामनेर) याने पिडीतेस त्याचे घरात पलंगाखाली लपवून ठेवत विनयभंग केला. मुलीच्या आईने याचा जाब विचारला असता  तुमच्याकडून  जे होईल ते करुन घ्या, अशी धमकी आरोपीने दिली.  घटनेची माहिती घरकुलातील नागरिकांना समजताच त्यांनी संशयितास घराबाहेर काढले आणि मारहाण केली. काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहाचले. संशयितास त्यांनी बाहेर काढले व वाहनात बसविले. संशयिताला आमच्या ताब्यात द्या,  अशी मागणी जमावातील लोक करीत होते. अशातच काही जणांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याने काचा फुटल्या. जमाव ऐकत नसल्याने पोलिसांनी लाठीमार करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. संशयित हफीज बेग याच्याविरुध्द पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे, उपनिरीक्षक अंबादास पाथरवट तपास करीत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी