जळगाव जिल्ह्यात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:23 PM2019-11-23T12:23:46+5:302019-11-23T12:24:05+5:30

भाजपच्यावतीने फटाको फोडून, पेढे वाटून आनंद व्यक्त

Jalosh in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात जल्लोष

जळगाव जिल्ह्यात जल्लोष

Next

जळगाव : महाराष्ंट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी येथे भाजपच्यावतीने जल्लोष करण्यात आला.
जळगाव शहरात भाजपच्या कार्यालयाजवळ आमदार सुरेश भोळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष केला.
अमळनेर येथे राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथविधी झाल्यानन्तर आमदार स्मिता वाघ आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या गटाने राजभवन समोर तर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मारुती मंदिरासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अद्याप संभ्रम कायम आहे
दुसºया गटातर्फे माजी आमदार शिरीष चौधरी, अ‍ॅड व्ही. आर. पाटील, सुनील भामरे, पंकज चौधरी, श्रीराम चौधरी, लालचंद सैनानी, साखरलाल महाजन, पांडुरंग महाजन, कल्याण पाटील हजर होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम आहे. त्यांच्यातर्फे प्रतिक्रिया व्यक्त करण्यास टाळाटाळ केली. सामान्य नागरिकांमध्ये मात्र अनपेक्षित घडामोडी बद्दल नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले जात होते.

Web Title: Jalosh in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव