Jalgaon's son praises PM | जळगावच्या सुपुत्राचे पंतप्रधानांकडून कौतुक
जळगावच्या सुपुत्राचे पंतप्रधानांकडून कौतुक

जळगाव : राष्ट्रीय पातळीवरील बालपुरस्कार मिळवणाऱ्या जळगावचा सुपुत्र देवेश भैय्या याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवरून अभिनंदन केले आहे. भारताबद्दलच्या माझ्या आशावादाला देवेश भैय्यासारखे तरूण बळकटी देतात, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. देवेश भैय्या याने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत झेप घेऊन आता छोट्या मुलांसाठी भारतातील सर्वोच्च पुरस्कारही मिळवला आहे. नुकताच हा पुरस्कार त्याला दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते देण्यात आला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी त्याचे टिष्ट्वट करून अभिनंदन केले आहे. देवशने अवघ्या १२ वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाश प्रदूषणाबाबत प्रशंसनीय काम केले आहे. एवढेच नव्हे तर सायन्स आॅलिम्पियाड व स्पर्धांमध्येही चांगले यश मिळवले आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Jalgaon's son praises PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.