शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यस्तरीय स्पर्धेत जळगावचा डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 23:30 IST

अभिजित राऊत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी तर सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतचीही ...

अभिजित राऊत सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी तर सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. बी. एन. पाटील : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतचीही छाप 

जळगाव : पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान २०२०-२१ अतंर्गत जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून तर जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचा सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत व ग्रामपंचायत निधी आपली छाप ठेवली आहे.

 

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय विभागाच्यावतीने माझी वसुंधरा अभियानातंर्गतमध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत पाच गटात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी पर्यावरण दिनी मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने झाला. 

 या समारंभासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे, बी. ए. बोटे आदी उपस्थितीत होते. 

 

जामनेर नगरपरिषदेला तृतीय

या स्पर्धेत नगरपरिषद गटात राज्यातील २२२ नगरपरिषदा सहभागी झाली होत्या. यात जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपरिषदेला तृतीय क्रमांकांचा पुरस्कार जाहिर झाला. हा पुरस्कार नगराध्यक्षा साधना महाजन आणि मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते ऑनलाईन स्वीकारला. 

 सर्वोत्कृष्ट नगरपंचायत गटात राज्यातील १३० नगरपंचायतींनी सहभाग घेतला होता. यात जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीस उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार नगराध्यक्षा  नजमा तडवी आणि मुख्याधिकारी समीर शेख यांनी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन स्वीकारला.

  सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत गटात राज्यातील २९१ ग्रामपंचायतीची निवड झाली होती. या गटात जिल्ह्यातील चिनावल, (ता. रावेर) ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार सरपंच  भावना बोरोले आणि ग्रामसेवक संतोष सपकाळ यांनी स्वीकारला तर पहूरपेठ, (ता. जामनेर) ग्रामपंचायतीस उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार सरपंच  नीता पाटील आणि ग्रामसेवक दत्तात्रय टेमकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते स्वीकारला.

टॅग्स :Jalgaonजळगाव