Jalgaon: बहिणीची छेड का काढली म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या भावावर तलवार हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 21:48 IST2023-04-03T21:47:45+5:302023-04-03T21:48:05+5:30
Crime News: बहिणीची छेड का काढाली याचा जाब विचारण्यास गेलेल्या जितू प्रकाश गारूंगे (३९, रा.जाखनी नगर) या भावावर चाकू हल्ला झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास जाखनी नगरमध्ये घडली.

Jalgaon: बहिणीची छेड का काढली म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या भावावर तलवार हल्ला
जळगाव : बहिणीची छेड का काढाली याचा जाब विचारण्यास गेलेल्या जितू प्रकाश गारूंगे (३९, रा.जाखनी नगर) या भावावर चाकू हल्ला झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास जाखनी नगरमध्ये घडली. जखमी भावावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.
जाखनी नगरात जितू हा कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. सोमवारी सायंकाळी काही तरूणांनी बहिणीची छेड काढली. याची माहिती बहिणीने भाउ जितू यांना दिली. त्यामुळे भाउ जिथे प्रकार घडला त्याठिकाणी टवाळखोरांना जाब विचारण्यासाठी गेला. बहिणीची छेड का काढली असा टवाळखोरांना विचारल्यावर त्यांनी जितू याला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर एकाने तलवारने डोळयावर वार केला. यात जितू हा गंभीर जखमी झाला. हा प्रकार त्याच्या कुटूंबियांना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेवून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर गंभीर जखमी जितू याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.