Jalgaon: पाच महिन्यात एसटीच्या तिजोरीत ३० कोटींची भर, १ कोटी १७ लाख महिलांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 23:00 IST2023-08-19T23:00:03+5:302023-08-19T23:00:48+5:30
Jalgaon: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने एसटी बसमध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के तिकीट सवलत योजना १७ मार्चपासून लागू करण्यात आली आहे. पाच महिन्यांत जळगाव आगाराच्या एसटी बसमध्ये प्रवाशांची मोठी संख्या वाढलेली आहे.

Jalgaon: पाच महिन्यात एसटीच्या तिजोरीत ३० कोटींची भर, १ कोटी १७ लाख महिलांचा प्रवास
- भूषण श्रीखंडे
जळगाव - महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने एसटी बसमध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के तिकीट सवलत योजना १७ मार्चपासून लागू करण्यात आली आहे. पाच महिन्यांत जळगाव आगाराच्या एसटी बसमध्ये प्रवाशांची मोठी संख्या वाढलेली आहे. त्यामुळे योजनेचा मोठा फायदा झाला असून खासगी प्रवासी वाहनाकंडे प्रवाशांनी पाठ फिरवलेली दिसत आहे. पाच महिन्यात जळगाव आगाराला
महिलांना ५० टक्के सवलत
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे महिला सन्मान योजना १७ मार्च २०२३ पासून सुरू करून महिलांना तिकीट दरात सरसकट ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे एसटी बस मध्ये महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे.
ज्येष्ठांना ५० टक्के सवलत
अमृत जेष्ठ नागरिक योजना २५ ऑगस्ट २०२२ पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने सुरू केली. या योजने अंतर्गत ६० ते ७५ वर्ष पर्यंत असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जात आहे. जुलै २०२३ पर्यंत या सवलतीचा ९ कोटी १४ लाख १ हजार २१३ ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला. यातून जळगाव आगाराला ४१ कोटी २८ लाख ८ हजार १७५ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.
पाच महिन्यांत किती महिलांनी केला प्रवास
महिना महिला उत्पन्न
मार्च १०६५८१०.......२५१७९१७६
एप्रिल २४४८८१७......६२५८५६२३
मे ३१७८४६८.......८६६०१०४७
जून २५७३१२८.......७१३६१८१४
जुलै २५१८९३७......६४११६०४८
एकूण ११७८५१६०....३०९८४३७०८