शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

दहावीमध्ये जळगावचा निकाल ९३.५२ टक्के 

By अमित महाबळ | Published: June 02, 2023 2:13 PM

शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या चार जिल्ह्यांमध्ये जळगावचा इयत्ता बारावीप्रमाणे दहावीचा निकाल देखील सर्वाधिक लागला आहे. 

 जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी, घोषित करण्यात आला. जळगाव जिल्ह्याचा निकाल ९३.५२ टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या चार जिल्ह्यांमध्ये जळगावचा इयत्ता बारावीप्रमाणे दहावीचा निकाल देखील सर्वाधिक लागला आहे. 

जळगाव जिल्ह्यातून ५६,२३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५५,९२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून उत्तीर्ण परीक्षार्थी ५२,३०७ असून, त्यांची टक्केवारी ९३.५२ एवढी आहे. निकालात विशेष प्राविण्य मिळविणारे २१,१७६ विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीमध्ये १९,८३७, द्वितीय ९,७३१ आणि उत्तीर्ण श्रेणीत १,५६३ विद्यार्थी आहेत. याही निकालात मुलांपेक्षा मुलीच आघाडीवर आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.५९ टक्के तर मुलांचे ९१.८९ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात २.२ टक्क्यांनी घट झाली आहे. निकालाची आकडेवारी सन २०२२ मध्ये ९५.७२ टक्के होती, तर आता ९३.५२ टक्के आहे. 

गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार- ऑनलाईन निकालानंतर विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयाव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत,  पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ही सुविधा मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शाळांमार्फतही अर्ज करता येणार आहे. -  उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत येणे अनिवार्य असून, ती मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. -  जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधारसाठी इच्छूक विद्यार्थ्यांसाठी दि. ७ जून पासून मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होतील.  - गुणपडताळणीसाठी दि. ०३ ते १२ जूनपर्यंत, तर छायाप्रतीसाठी दि. ३ ते २२ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. 

 गुणपत्रिका बुधवारी मिळणार-  विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या शाळेमार्फत बुधवारी (दि. १४) दुपारी ३ वाजता वितरित करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Result Dayपरिणाम दिवसSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी