आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२६ : रामनवमी मिरवणुकीत विना परवानगी वाद्य वाजविल्याप्रकरणी शुभम प्रल्हाद तायडे, नीलेश युवराज सपकाळे व मोहन अंबिकाप्रसाद तिवारी या तिघांविरुध्द सोमवारी शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी तीन वाजता वाल्मिक नगरातून रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूक शनी पेठ पोलीस चौकी, भिलपुरा पोलीस चौकी, घाणेकर चौक, टॉवर चौक, दाणाबाजार, सुभाष चौक मार्गे मिरवणूक रथ चौकात गेली. या मिरवणुकीत आयोजकांनी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले. याशिवाय जिल्हाधिकाºयांच्या जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन झाल्याने शनी पेठ पोलीस स्टेशनचे हवालदार विजयकुमार दत्तात्रय सोनार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार सोमवारी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावात विना परवानगी वाद्य वाजविल्याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 18:15 IST
शनीपेठ पोलिसांनी केली कारवाई
जळगावात विना परवानगी वाद्य वाजविल्याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा
ठळक मुद्देमिरवणुकीसाठी आयोजकांनी घेतली नाही परवानगीशनीपेठ पोलिसांनी तिघांविरूद्ध केला गुन्हा दाखलविना परवाना वाद्य वाजविल्याने झाली कारवाई