Jalgaon: नशिराबादमध्ये निवडणुकीच्या कामावरून दोन गटांत तुफान राडा, १७ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:22 IST2026-01-20T12:21:52+5:302026-01-20T12:22:44+5:30

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे दोन गटांत भीषण हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. नगरपरिषद निवडणुकीच्या कामावरून झालेल्या वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Jalgaon Nashirabad Nagar Parishad Election 2026 Clash, 17 Injured, Video Goes Viral | Jalgaon: नशिराबादमध्ये निवडणुकीच्या कामावरून दोन गटांत तुफान राडा, १७ जण जखमी

Jalgaon: नशिराबादमध्ये निवडणुकीच्या कामावरून दोन गटांत तुफान राडा, १७ जण जखमी

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे नगरपरिषद निवडणुकीच्या कामावरून दोन गटांत तुफान राडा झाला. किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले असून यात विटा, दगड, लाकडी दांडके आणि धारदार शस्त्रांचा मुक्त वापर करण्यात आला. या हिंसक घटनेत एकूण १७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषद निवडणुकीच्या कामावरून दोन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी विटा, दगड, लाकडी काठ्या, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला चढवला, यात १७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना ताबडतोब जळगावातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडताना, आरडाओरडा करताना आणि दगडफेक करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title : जलगांव: नाशिराबाद में चुनाव कार्य को लेकर हिंसा, 17 घायल

Web Summary : जलगांव के नाशिराबाद में नगर पालिका चुनाव के काम को लेकर दो गुटों में झड़प हो गई, जिसमें 17 लोग गंभीर रूप से घायल हो गए। हिंसा में पत्थर, लाठी और धारदार हथियारों का इस्तेमाल किया गया, जिससे इलाके में तनाव है। घायलों का अस्पताल में इलाज चल रहा है।

Web Title : Jalgaon: Election Dispute Turns Violent; 17 Injured in Nashirabad Clash

Web Summary : A clash in Nashirabad, Jalgaon, over municipal election work left 17 seriously injured. The violence involved stones, sticks, and sharp weapons, creating tension in the area. Injured individuals are receiving treatment at a local hospital.