Jalgaon Election Results : 303 उमेद्वारांच्या भाग्याचा आज होणार फैसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 08:32 IST2018-08-03T07:51:41+5:302018-08-03T08:32:07+5:30
मनपाच्या ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात असून या सर्व उमेदवारांचा भाग्याचा आज फैसला होणार आहे.

Jalgaon Election Results : 303 उमेद्वारांच्या भाग्याचा आज होणार फैसला
जळगाव - महानगरपालिकेवर भाजपाचे कमळ फुलणार की शिवसेनेचा भगवा फडकणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मनपाच्या ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात असून या सर्व उमेदवारांचा भाग्याचा आज फैसला होणार आहे.
मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, १ आॅगस्ट रोजी मतदान झाले. ५५.७२ टक्के मतदान झाले. शुक्रवार, ३ रोजी मतमोजणी असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. एमआयडीसीतील ई-८ सेक्टर गोडाऊनमध्ये सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.
सर्व मतमोजणी कर्मचारी व अधिका-यांना सकाळी आठ वाजेपूर्वीच मतमोजणीस्थळी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते त्यांचे मतमोजणी साहित्य घेऊन त्यांच्या जागेवर बसतील व मतमोजणीची पूर्व तयारी सकाळी १० पर्यंत पूर्ण होईल.
सध्याचे पक्षीय बलाबल
२०१३
खाविआ-३३
भाजपा-१५
/>मनसे-१२
राष्ट्रवादी-११
जनक्रांती - २
मविआ - १
अपक्ष - १
एकूण-७५