Jalgaon: जळगाव मनपाचा मोठा निर्णय, विधवा महिलांना मुलींच्या लग्नासाठी मिळणार २१ हजार रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:03 IST2026-02-20T12:00:41+5:302026-02-20T12:03:00+5:30
Jalgaon Municipal Corporation Scheme: पतीच्या निधनानंतर संसाराचा गाडा ओढणाऱ्या विधवा आणि निराधार मातांसाठी जळगाव महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे.

Jalgaon: जळगाव मनपाचा मोठा निर्णय, विधवा महिलांना मुलींच्या लग्नासाठी मिळणार २१ हजार रुपये!
पतीच्या निधनानंतर संसाराचा गाडा ओढणाऱ्या विधवा आणि निराधार मातांसाठी जळगाव महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. मुलीच्या लग्नासाठी आर्थिक विवंचनेत असलेल्या मातांना आता पालिकेकडून २१ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या इतिहासात ही योजना पहिल्यांदाच राबविली जात आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ही योजना आखण्यात आली असून, एकूण २३ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर हा लाभ दिला जाणार असल्याने, पात्र महिलांनी तातडीने अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज कुठे व कधी करायचा?
अंतिम मुदत: २५ फेब्रुवारी २०२६ (कार्यालयीन वेळेत).
ठिकाण: महानगरपालिका मजला क्रमांक ६, डे एनयूएलएम विभाग,
अर्ज स्वरूप: साध्या कागदावर स्वहस्ताक्षरीत किंवा संगणकीकृत अर्ज स्वीकारले जातील.
पात्रता आणि अटी
१) अर्जदार महिला जळगाव मनपा क्षेत्रात किमान १० वर्षांपासून वास्तव्यास असावी.
२) मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे.
३) आईने पुनर्विवाह केलेला नसावा (तसे प्रतिज्ञापत्र आवश्यक).
४) योजनेचा लाभ थेट बँक खात्यात जमा केला जाईल.
आवश्यक कागदपत्रे
वयाचा पुरावा: मुलीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा १०वी/१२वीचे प्रमाणपत्र.
निवासाचा पुरावा: जळगाव महापालिका हद्दीत १० वर्षांपासून राहत असल्याचा दाखला.
ओळखपत्र: आई व मुलीचे आधारकार्ड.
इतर: पतीचा मृत्यू दाखला, पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड, बँक पासबुकचे पहिले पान.
विशेष कार्ड: संजय गांधी निराधार योजनेचे कार्ड आणि पुनर्विवाह न केल्याचे स्वस्वाक्षांकित प्रतिज्ञापत्र.
"पात्र महिलांनी तातडीने मुदतीत आपले अर्ज मनपाच्या सहाव्या मजल्यावरील विभागात सादर करावेत. जास्तीत जास्त गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा", असे आवाहन जळगाव महानगरपालिकेच्या उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे यांनी केले आहे.