जळगाव- ममुराबाद रस्त्याचे दुरुस्तीकरण निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:10 AM2021-02-19T04:10:46+5:302021-02-19T04:10:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : यावल तालुक्यातील किनगावला झालेल्या मोठ्या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जळगाव-ममुराबाद रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास एकदाची ...

Jalgaon-Mamurabad road repairs are of inferior quality | जळगाव- ममुराबाद रस्त्याचे दुरुस्तीकरण निकृष्ट दर्जाचे

जळगाव- ममुराबाद रस्त्याचे दुरुस्तीकरण निकृष्ट दर्जाचे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : यावल तालुक्यातील किनगावला झालेल्या मोठ्या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जळगाव-ममुराबाद रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास एकदाची सुरुवात केली आहे. मात्र, घाईगर्दीत खड्ड्यांमध्ये डांबराचे प्रमाण खूपच कमी वापरले जात असल्याने भरधाव वाहनांमुळे जाड खडी लगेच उखडण्यास सुरुवातही झाली आहे.

जळगावहून ममुराबादमार्गे यावल तसेच चोपडा व भोकर जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांसह एसटी बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात असताना बांधकाम विभागाने या रस्त्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडले होते. गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांची साधी दुरुस्ती करण्याची तसदी संबंधितांनी घेतली नव्हती. काही महिन्यांपूर्वीच ममुराबाद बसस्थानकाजवळ पूर्णत्वास आलेल्या २५० मीटरच्या डांबरी रस्त्याचीही वर्षभरात वाट लागली. साईडपट्ट्यांचे काम पूर्ण न केल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. मात्र, बांधकाम विभागाने रस्ता वापरणाऱ्यांपेक्षा ठेकेदारांचे हित जोपासण्यावर जास्त भर दिला. परिणामी, लहान खड्डे मोठ्या खड्ड्यांमध्ये रूपांतरित होण्यास उशीर लागला नाही. दुचाकी व चारचाकी वाहने खिळखिळी होऊन अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले. किनगावच्या घटनेनंतर बांधकाम विभागाने आता ममुराबाद रस्त्याचे दुरुस्तीकरण हाती घेतले आहे. मात्र, पुढे खड्डे बुजविण्याचे काम सुरू असतांना मागे लगेच त्यासाठी वापरलेली खडी उखडून बाहेर येऊ लागली आहे. रस्त्यावर विखुरलेल्या खडीमुळे वाहने घसरू लागली आहेत. विशेष म्हणजे या कामावर लक्ष ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही कर्मचारी सध्या कार्यरत नाही. थातूरमातूर पद्धतीने सुरू असलेले हे काम व त्यासाठी होणारा खर्चही त्यामुळे वाया जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वाहनधारकांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

-----------------------

फोटो-१८सीटीआर१६

जळगाव- ममुराबाद रस्त्यावरील खड्डे बुजविल्यानंतर त्यातील जाड खडी अशी उखडून बाहेर येऊ लागली आहे. (जितेंद्र पाटील)

Web Title: Jalgaon-Mamurabad road repairs are of inferior quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.