jalgaon jawan yash deshmukh martyred in terrorist attack in srinagar | 'यश देशमुख अमर रहे...'; महाराष्ट्राच्या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी लोटला जनसागर

'यश देशमुख अमर रहे...'; महाराष्ट्राच्या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी लोटला जनसागर

ठळक मुद्देयश देशमुख यांच्या पार्थिवावर पिंपळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कारमहाराष्ट्राच्या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी लोटला जनसागरश्रीनगरमध्ये २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात यश यांना वीरमरण

जळगाव
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद जवान यश देशमुख यांना त्यांच्या मूळगावी जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. यश देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी जनसागर लोटला होता. पिंपळगावात यावेळी 'शहीद जवान यश देशमुख अमर रहे... भारत माता की जय...वंदे मातरम' चा जयघोष सुरू होता. 

श्रीनगरमध्ये २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. यात यश देशमुख यांचा समावेश होता. यश यांना अवघ्या २१ व्या वर्षी वीरमरण आलं. यश गेल्याचं कळताच त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली. यश यांचं पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव येथे आणण्यात आलं आणि शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत यश यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

यश देशमुख गेल्याच वर्षी लष्करात भरती झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीरमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Web Title: jalgaon jawan yash deshmukh martyred in terrorist attack in srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.