जळगाव कारागृहाची उंची वाढवणार - कारागृह उपमहानिरीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 13:14 IST2018-12-06T13:13:33+5:302018-12-06T13:14:20+5:30
जळगाव येथील कारागृहातून दोन कैद्यांनी पलायन केल्याने या कारागृहातील भिंतीची उंची कमी असून ती लवकरच वाढवण्यात येणार असल्याचे, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले.

जळगाव कारागृहाची उंची वाढवणार - कारागृह उपमहानिरीक्षक
जळगाव : जळगाव येथील कारागृहातून दोन कैद्यांनी पलायन केल्याने या कारागृहातील भिंतीची उंची कमी असून ती लवकरच वाढवण्यात येणार असल्याचे, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले. कारागृहातून दोन कैद्यांनी पलायन केल्याची घटना बुधवार ( ५ डिसेंबर) रोजी घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी आज कारागृहाला भेट देवून चौकशी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
(जळगावातील कारागृहातील आरोपी पलायन प्रकरणाची होणार विभागीय चौकशी)
देसाई म्हणाले की, कैद्यांच्या पलायनप्रकरणी दक्षता पथकाकडून चौकशी सुरू आहे. दोषी कर्मचा-यांवर कारवाई करण्यात येईल. येथील कारागृहाची क्षमता २०० जणांची असताना त्यात ४५० कैदी आहेत. त्यामुळे कर्मचा-यांवर मोठा भार आहे. त्यामुळे कर्मचारी संख्या वाढविण्यात येईल.