जळगाव घरकूल प्रकरणाचे आता १५ जुलै रोजी कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 13:59 IST2019-06-27T13:59:31+5:302019-06-27T13:59:55+5:30
पोलीस बंदोबस्त

जळगाव घरकूल प्रकरणाचे आता १५ जुलै रोजी कामकाज
धुळे : येथील विशेष न्यायालयात सुरु असलेल्या जळगाव घरकूल प्रकरणाचे कामकाज आता १५ जुलै रोजी होणार आहे. आज पोलीस बंदोबस्त होता.
हा निकाल ७ जून रोजी लागणार होता, मात्र न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ या रजेवर होत्या. त्यामुळे त्या वेळी २७ जून पुढील तारीख देण्यात आली होती.
तत्पूर्वी २१ मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान, संशयितांची हजेरी घेण्यात आली होती. त्यावेळी गैरहजर असणाऱ्या चार संशयिताविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वारंट बजावण्यात आले होते.