Jalgaon Election Results : जळगावात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी धरला ठेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 15:12 IST2018-08-03T15:11:05+5:302018-08-03T15:12:17+5:30
जळगाव महापालिका निवडणूक निकाल - २०१८

Jalgaon Election Results : जळगावात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी धरला ठेका
ठळक मुद्देभव्य ध्वज घेत जल्लोष भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजपाने ५७ जागांवर आघाडी घेतल्यानंतर भाजपा कार्यालयात जल्लोष सुरू झाला. त्यानंतर विजय निश्चित असल्याचे समोर दिसताच या ठिकाणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीदेखील ठेका धरला. या वेळी त्यांनी हाती भाजपाचे भव्य ध्वज घेत जल्लोष केला.
या वेळी गुलालाची उधळून करण्यात येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी आमदार सुरेश भोळे, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.