शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात यंदा टंचाई आराखड्यात टँकर संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:52 IST

२१३ कोटींचा प्रस्ताव : २९१ गावांना ३५६ योजना प्रस्तावित

जळगाव : यंदा झालेल्या अतिवृष्टी व सरासरीपेक्षा दीडपट पावसामुळे पाणीपातळीत वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात टँकरच्या संख्येत घट होणार आहे. दरम्यान जि.प.ने २०१९-२० साठी २१२ कोटी ६८ लाखांचा प्राथमिक टंचाई आराखडा तयार केला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हापरिषदेकडून संभाव्य टंचाईवरील उपाययोजनांचा आराखडा मागविला जातो. त्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूरी देऊन टंचाई विभागाच्या नियंत्रणाखाली या आराखड्याची अंमलबजावणी केली जात असते. यंदा पावसाळाच खूप लांबल्याने व निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आराखड्याचे काम थोडे लांबणीवर पडले आहे.२९१ गावांचा ३५६ उपाययोजनांचा आराखडाजि.प.कडून संभाव्य पाणीटंचाई आरखडा तयार करण्यात येत असून तो अंतीम टप्प्यात आले. सुमारे २१२ कोटी ६८ लाखांचा हा टंचाई आराखडा असून त्यात २९१ गावांचा समावेश असून त्यात टंचाई निर्मुलनासाठी सुमारे ३५६ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असल्याचे समजते.टँकरच्या संख्येत होणार घटमागील वर्षी तीव्र पाणीटंचाई असल्याने जिल्ह्यात गत १५ वर्षातील तीव्र दुष्काळ होता. त्यामुळे तब्बल २२१ टँकर द्वारे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर पावसाळ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सरासरीच्या १४० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले, विहीरींना पाणी अजूनही कायम आहे. फेब्रुवारीपर्यंत त्यामुळे पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी शक्यता असल्याने यंदा टँकरच्या संख्येत कपात होण्याचा अंदाज आहे.चाºयाची मात्र टंचाई जाणवण्याची भिती... यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात चारा टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. कृषी विभागाला मागील वर्षी डीपीडीसीतून ६० लाख रूपये चारा बियाणांसाठी दिले होते. त्यातून धरणांच्या आटलेल्या पाणीसाठ्यामुळे गाळाच्या जमिनीवर तसेच शेतकºयांनी शेतात चाºयाची लागवड केली होती. सुमारे २ हजार हेक्टरवर चारा लागवड केल्याने चाराटंचाईवर मात करता आली होती. त्यामुळे गुरूवारी झालेल्या ‘आत्मा’च्या बैठकीत यंदा नियोजनमधून १ लाख २० हजारांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मंजूर झाल्यास ४ हजार हेक्टरवर चारा लागवड शक्य होऊन चाराटंचाईच्या समस्येवर मात करता येईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव