जळगाव : जिल्ह्यात १६ रोजी एकाच दिवशी जोरदार पाऊस झाल्याने सरासरी ३९.९ टक्क्यांवरून थेट ५१.२ टक्क्यांवर पोहोचली असून या पावसाने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पन्नाशी गाठली आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. इतकेच नव्हे धरणसाठ्यातही वाढ होण्यास मदत झाली आहे. मात्र पावसाळ््याचा केवळ दीडच महिना शिल्लक असल्याने यंदा सरासरी एवढा पाऊस होतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तापी नदीला पूर आल्याने हतनूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. धरणात मात्र ३९.४१ टक्केच पाणीसाठा आहे. पाण्याची मोठी आवक असली तरी धरणाचे दरवाजे उघडून ते पाणी सोडून देण्यात आले. पावसाळ्याच्या शेवटी हे धरण भरले जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.वाघूर नदीला पहूर, वाकोद परिसरातून नाले, ओढ्यांचे पाणी येऊन मिळाल्याने नदी वाहती झाली. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात किमान १० टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वाघूर धरणावर जळगाव शहराची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. धरणात सध्या ३६.३६ टक्के पाणीसाठा आहे. या सोबतच गिरणा धरणातही ३०.३४ टक्के पाणीसाठा आहे.
जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 19:59 IST
जिल्ह्यात १६ रोजी एकाच दिवशी जोरदार पाऊस झाल्याने सरासरी ३९.९ टक्क्यांवरून थेट ५१.२ टक्क्यांवर पोहोचली असून या पावसाने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पन्नाशी गाठली आहे.
जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५० टक्के पाऊस
ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यात बळीराजा सुखावलाजळगावातील धरण साठ्यातही वाढदीड महिन्यात सरासरी गाठण्याची अपेक्षा