शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

जळगाव : करप्याला प्रतिकारक केळी वाणाचा शोध, दोन महिने आधीच होणार निसवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 8:42 AM

अतिवृष्टी आणि वादळीवा-याचा पहिला फटका केळीला बसत असतो. यामुळे उत्पादकांचे मोठेच नुकसान होते. यावर उपाय म्हणून जळगावच्या केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केळीची नवे वाण शोधून काढले आहे.

चुडामण बोरसे/जळगाव - अतिवृष्टी आणि वादळीवा-याचा पहिला फटका केळीला बसत असतो. यामुळे उत्पादकांचे मोठेच नुकसान होते. यावर उपाय म्हणून जळगावच्या केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केळीची नवे वाण शोधून काढले आहे. करप्याला प्रतिकारक असलेले हे वाण कमी कालावधित तयार होत असल्याचा या शास्त्रज्ञांचा दावा आहे.

केळी हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक मानले जाते. प्रति हेक्टरी उत्पादन वाढवायचे असल्यास सध्याचे खते वापरण्याचे प्रमाण व पद्धतीत बदल आवश्यक आहे. केळीसाठी पाण्याचे कार्यक्षम नियोजन ही यशस्वी केळी उत्पादनाची गुरुकिल्ली आहे.जिल्ह्यातील सध्या असलेल्या केळी ही तापमान आणि अतिवृष्टी तसेच वादळाला बळी पडते. वादळी वारे आले की त्याचा पहिला फटका हा जणू केळीला बसत असतो.

यावर या संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केळीचे एक नवीन वाण शोधून काढले आहे. बीआरएस सिलेक्शन २०१३-३ (बीआरएस म्हणजे बनाना रिसर्च स्टेशन) असे केळीच्या वाणाचे नामकरण करण्यात आले आहे. या नव्या वाणाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. पुढील वर्षी संयुक्त कृषी संशोधन मंडळाच्या बैठकीत या नव्या वाणाला मान्यता दिली जाईल, अशी माहिती केळी संशोधन केंद्रातील उद्यानविद्यावेत्ता प्रा.एन.बी शेख यांनी दिली.

सन २०१३ पासून या संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी या नव्या वाणाच्या केळीवर संशोधन सुरु केले. त्याला तब्बल चार वर्षांनी यश आले आहे. या नवीन बीआरएस वाणाची जळगावाच्याच केळी संशोधन केंद्र व इतर ठिकाणी साधारण केळीची २०० झाडे लावण्यात आली. त्यावर संशोधन सुरू झाले. ठिबकच्या साहाय्याने खते देण्यात आली. त्यात केळीच्या एका झाडाला २०० गॅ्रम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद आणि २०० ग्रॅम पालाश अशी खते गरजेनुसार देण्यात आली. केळीच्या गुणधर्मात कुठलाही बदल होणार नाही, याची काळजी पहिल्यापासून घेण्यात आली. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रदीर्घ अशा संशोधनातून नवीन वाण पुढे आले आहे. संशोधित केलेल्या नवीन केळीचे झाडांची उंची दीड मीटर आहे. या झाडाचे वजन २२ किलोपर्यंत आहे. विशेष म्हणजे हे झाड करपाही सहन करु शकते, अशी याची क्षमता आहे. आणि अतिशय अल्प अशा खर्चात केळी पिकविली जाऊ शकते. एका फणीला १३ ते १४ केळी लागली आहेत. ३२१ दिवसात येणाºया या केळीचा गोडवा नेहमीच्या केळीसारखाच आहे.

या संशोधनासाठी केळी संशोधन केंद्रातील प्रा.एन.बी.शेख यांच्यासह त्यांचे सहकारी व्ही.पी. भालेराव, प्रा. सुरेश परदेशी, वेदांतिका राजे निंबाळकर, अंजली मेढे, डॉ. राकेश सोनवणे यांनी सहकार्य केले.सामान्य शेतक-याला हे वाण परवडेल, त्याला खर्च कमी लागेल आणि कमी दिवसात चांगले उत्पन्न मिळू शकेल, असे वाण संशोधन करावे, असे गेल्या काही वर्षापासून मनात होते, त्याला यश आले आहे. पुढील वर्षी या वाणला मान्यता मिळेल, अशी अशा आहे.- प्रा.एन.बी. शेख, उद्यानविद्यावेत्ता, केळी संशोधन केंद्र, जळगाव 

 

टॅग्स :foodअन्नFarmerशेतकरीJalgaonजळगाव