शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

महाराष्ट्र एक्सप्रेसमधून १२ लाखांचे दागिने लंपास, महिलेच्या पर्समधून लांबविला ऐवज

By विजय.सैतवाल | Updated: February 2, 2025 15:16 IST

Jalgaon Crime News: पुणे येथील नातेवाईकांकडे आयोजित कार्यक्रमाहून बडनेरा येथे परताना संध्या चंद्रकांत राठी (६९, रा. अमरावती) यांच्या पर्समधून रोख १० हजार रुपयांसह ११ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले.

- विजयकुमार सैतवालजळगाव - पुणे येथील नातेवाईकांकडे आयोजित कार्यक्रमाहून बडनेरा येथे परताना संध्या चंद्रकांत राठी (६९, रा. अमरावती) यांच्या पर्समधून रोख १० हजार रुपयांसह ११ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले. ही घटना १ जानेवारी रोजी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये घडली. या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

अमरावती येथील संध्या राठी यांच्या नातेवाईकांकडे पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे त्यांच्यासह त्यांचे पती डॉ. चंद्रकांत राठी व अन्य दोन नातेवाईक गेले होते. तेथून ते ३१ जानेवारी रोजी रात्री महाराष्ट्र एक्सप्रेसने बडनेरापर्यंत येण्यास निघाले. प्रवासामध्ये संध्या राठी यांनी सोबत असलेले तीन व दुसरी दोन तोळ्याच्या अशा सोन्याच्या दोन चैन, डायमंड मंगळसूत्र, कानातील आठ तोळ्याचे झुमके, पाच ग्रॅमचे टॉप्स व रोख १० हजार रुपये एका बॉक्समध्ये ठेवून ते पर्समध्ये ठेवले. रात्री झोपल्या त्या वेळी त्यांनी ही पर्स बर्थवर स्वत:जवळच ठेवली. सकाळी सात वाजेच्या सुमारास पाचोरा स्थानकापूर्वी त्यांनी पर्स पाहिली असता त्यात रोकड व दागिने सापडले नाही. त्या वेळी त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र ऐवज न सापडल्याने त्यांनी रेल्वेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविली. त्या वेळी तसा संदेश रेल्वे नियंत्रण कक्षातून लोहमार्ग पोलिसांना मिळताच जळगाव स्थानकावरील रेल्वे पोलिस चौकीचे पोहेकॉ सचिन भावसार यांनी जळगाव स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस आल्यानंतर तक्रार नोंदवून घेतली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव