'बेटा टेन्शन मत ले, तीन साल का...'; हॉटेल मालकाच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने स्वतःला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:11 IST2025-09-16T16:09:44+5:302025-09-16T16:11:10+5:30

जळगावात हॉटेलच्या मालकाला कंटाळून व्यावसायिकाने स्वतःला संपवल्याची घटना घडली.

Jalgaon Crime Businessman end life after being harassed by hotel owner | 'बेटा टेन्शन मत ले, तीन साल का...'; हॉटेल मालकाच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने स्वतःला संपवलं

'बेटा टेन्शन मत ले, तीन साल का...'; हॉटेल मालकाच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने स्वतःला संपवलं

Jalgaon Crime: भाडेतत्त्वावर घेतलेल्या हॉटेलमध्ये मोठा खर्च केल्यानंतर ती खाली करून देण्यासाठी सतत तगादा लावल्याने त्यास कंटाळून हॉटेल चालक आशिष मधुकर फिरके (४८, रा. सांगवी, ता. यावल, ह.मु, संत निवृत्ती नगर, जळगाव) यांनी रौनक हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (१४ सप्टेंबर) मध्यरात्री दीड वाजता समोर आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आशिष फिरके यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटनुसार, ते रिंगरोडवरील जागेत तीन वर्षापासून हॉटेल व्यवसाय करीत होते. यासाठी जागा मालकाला तीन वर्षांचे अॅग्रीमेंट करून दिले होते.

आशीष फिरके यांनी रात्री १२:४० वाजता सुसाईट नोटचे स्टेटस ठेवले होते. फिरके यांच्या एका ग्राहकाला रात्री ते दिसले. त्यानंतर ते जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पोहोचले व या विषयी माहिती दिली. त्यावेळी पोउनि शांताराम देशमुख, पोहेकॉ महेंद्र पाटील हे या ग्राहकाला घेऊन हॉटेलमध्ये पोहचले. फिरके हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

जागा मालक सतत तगादा लावत होता. तसेच वेळोवेळी त्याचा मुलगाही खूप धमक्या देत होता. त्यामुळे आत्महत्या करीत आहे, असे सुसाईड नोटमध्ये नमूद करून व ती स्टेटसवर ठेवून आशिष फिरके यांनी रिंग रोडवरील हॉटेल रौनकमध्ये रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गळफास घेतला. फिरके यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

काय म्हटलं सुसाईड नोटमध्ये?

"मी आशिष मधुकर फिरके असे लिहुन देतो की, माझ्या मौतीला जबाबदार फक्त आणि फक्त श्री रामसहाय शर्मा म्हणजे हॉटेल रोनक या जागेचे मालक. मी यांच्या जागेत तीन वर्षापासून हॉटेल व्यवसाय करतो. तरी मला यांनी आधी तीन वर्षाचे अग्रीमेंट करुन दिले होते आणि आता मला सांगितले की, बेटा टेन्शन मत ले. मै अग्रीमेंट तीन साल का कर दुंगा. त्यांनी मला सांगितले तु तेरे हिसाबसे हॉटेल बना ले. मी खुप खर्च पण लावला. आणि आता अचानक त्यांनी मला जागा खाली करुन दे, असं मला सतत टॉर्चिंग करत होते. मी खूप विनंती करुनही मला त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले. मी त्यांना सांगितले की, मला दोन लहान मुले आहे, त्यांचा तरी विचार करा. तर ते मला म्हटले की, मुझे कुछ लेना देना नही. आणि मला खुप टॉर्चींग करत होते. वेळोवेळी त्यांचा मुलगा श्री रजनील रामसहाय शर्मा यांनी खूप धमक्या दिल्या. म्हणून मी आत्महत्या करत आहे," असे फिरके यांनी म्हटलं. 

Web Title: Jalgaon Crime Businessman end life after being harassed by hotel owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.