जळगाव शहरात रामनवमीच्या मिरवणुकीला लागले गालबोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:28 IST2018-03-25T23:28:40+5:302018-03-25T23:28:40+5:30
श्रीराम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला रविवारी रात्री आठ वाजता गालबोट लागले. माजी नगरसेवक कैलास सोनवणे व हॉकर्स संघर्ष समितीचे होनाजी चव्हाण यांचे बंधू यशाजी हेमराज चव्हाण यांच्यात भवानी मंदिराजवळ हाणामारी झाली. या दरम्यान कैलास सोनवणे यांनी यशाजी यांच्यावर पिस्तुल रोखल्याचा आरोप केला आहे. सोनवणे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

जळगाव शहरात रामनवमीच्या मिरवणुकीला लागले गालबोट
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २५ :श्रीराम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला रविवारी रात्री आठ वाजता गालबोट लागले. माजी नगरसेवक कैलास सोनवणे व हॉकर्स संघर्ष समितीचे होनाजी चव्हाण यांचे बंधू यशाजी हेमराज चव्हाण यांच्यात भवानी मंदिराजवळ हाणामारी झाली. या दरम्यान कैलास सोनवणे यांनी यशाजी यांच्यावर पिस्तुल रोखल्याचा आरोप केला आहे. सोनवणे यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.
मल्लखांब पथकाचे स्वागत करीत असताना धक्काबुक्की
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामनवमी निमित्त रविवारी शहरात विविध संघटना व मंडळातर्फे श्रीरामाची मिरवणूक काढण्यात आली. बळीराम पेठेत मिरवणूक आल्यावर मल्लखांब पथकाचे स्वागत करीत असताना कैलास सोनवणे व यशाजी सोनवणे यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यातून दोघांनी एकमेकाला मारहाण केली. या घटनेत यशाजी यांना डोळ्याजवळ दुखापत झाली. दोघांनी शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून झाल्या प्रकाराची माहिती दिली. चव्हाण यांना मेमो देऊन पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात पाठविले. चव्हाण यांच्यावर वॉर्ड क्रमांक आठमध्ये उपचार सुरु आहेत.