Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:30 IST2025-11-10T17:28:50+5:302025-11-10T17:30:26+5:30
जळगाव जिल्ह्यातील वाकोदमध्ये एका कारचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर कारला लागलेल्या आगीत पत्नीचा मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे.

Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी
वाकोद (जि. जळगाव) : भरधाव कार दुभाजकावर धडकल्याने कारला आग लागली. यात पती गंभीररित्या भाजला गेला, तर पत्नीचा होरपळून मृत्यू झाला आहे. अंगावर शहारे आणणारी ही घटना सोमवारी (१० नोव्हेंबर) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाकोद (ता. जामनेर) नजीक घडली.
जान्हवी संग्राम मोरे (२१) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पती संग्राम जालमसिंग मोरे (२३, रा. कुलमखेडा, जि. बुलढाणा) हा गंभीररित्या भाजला आहे. जान्हवी ही पतीसोबत माहेरी बोहार्डी (ता. भुसावळ) येथे आली होती.
छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना अपघात
तिथून ते कारने छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. वाकोदनजीक त्यांची कार दुभाजकावर धडकली आणि कारला आग लागली. जान्हवी ही सहा महिन्याची गर्भवती होती, अशी माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.