जैन सोशल ग्रुपतर्फे पाच गरजू महिलांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:11 AM2021-07-22T04:11:32+5:302021-07-22T04:11:32+5:30

सदर कुटुंबांना दरमहा पुरेल एवढे अन्नधान्य दर महिन्याच्या १५ तारखेला देण्यात येणार आहे. या महिन्यात १५ जुलै रोजी सदर ...

Jain Social Group helps five needy women | जैन सोशल ग्रुपतर्फे पाच गरजू महिलांना मदत

जैन सोशल ग्रुपतर्फे पाच गरजू महिलांना मदत

Next

सदर कुटुंबांना दरमहा पुरेल एवढे अन्नधान्य दर महिन्याच्या १५ तारखेला देण्यात येणार आहे. या महिन्यात १५ जुलै रोजी सदर कुटुंबांना अन्नधान्य देऊन या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. सदर महिलांचे पालनपोषण करणारे कुणीही नसल्याने सामाजिक दायित्व म्हणून जैन सोशल ग्रुपने ही जबाबदारी स्वीकारली आहे. या अन्नधान्य किटमध्ये तांदूळ, तूरडाळ, तेल पाऊच, गव्हाचे पीठ, साखर, लाल मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, राई, जिरे, गरम मसाला, चहा पावडर आदी वस्तूंचा समावेश आहे. हे किट देताना ग्रुपचे अध्यक्ष राजेश बेदमुथा, सेक्रेटरी पुनम कोचर, महावीर सिंघवी, पलाश जैन, गोकुल पारख, दिनेश जैन, राजेंद्र छाजेड, रिषभ जैन, कैलाशचंद लोढ़ा व गरीब कुटुंबीय उपस्थित होते.

फोटो २२/१

Web Title: Jain Social Group helps five needy women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.