शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

विम्याचे सर्वेक्षण आता कर्मचाऱ्यांमार्फत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:47 IST

जळगाव : विमा उतरवण्यात आल्यानंतर मालमत्ता व एखाद्या वस्तूचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीचे सर्वेक्षण आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा भारतीय ...

जळगाव : विमा उतरवण्यात आल्यानंतर मालमत्ता व एखाद्या वस्तूचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीचे सर्वेक्षण आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा भारतीय विमा नियामक संस्था विचार करत असून याविरोधात अधिकृत सर्वेअर्संनी सोमवारपासून तीन दिवसांचे कामबंद आंदोलन सुरु केले आहे. याअंतर्गत बुधवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे.भारतीय विमा नियामक संस्थे (आयआरडीए)ने अधिकृत सर्वेअर्संना डावलून कार्यालयीन कर्मचाºयांकडूनच नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचा विचार सुरु केला आहे. एखाद्या मालमत्तेचा वा वस्तूचा विमा काढला आणि त्या वस्तूंचे नुकसान झाले तर यापूर्वी त्या त्या विमा कंपनीशी संबंधित अधिकृत सर्वेअरकडून त्या नुकसानीचे मूल्यांकन केले जात होते. मात्र आता ते कार्यालयीन कर्मचाºयांकडूनच करण्याचा विचार सुरु आहे. असे झाले तर मालमत्तेचे नुकसान आणि कर्मचाºयांनी केलेले मूल्यांकन यात तफावत आढळून ग्राहकांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती या अधिकृत सर्वेअर्संनी व्यक्त केली आहे.भारतीय विमा नियामक संस्था सर्वेअर्स नेमताना त्या त्या क्षेत्रातील पदवीधर व अनुभवी यांना परवाना देते. खासगी विमा कंपनीत काम करणाºया विमा कर्मचाºयांना कोणताच अनुभव नसताना ते मूल्यांकन कसे करू शकतात? असा सवाल या सर्वेअसर््ंनी केला आहे.भारतीय विमा नियामक संस्थेचा हा निर्णय अत्यंत चुकीचा असून खाजगी विमा कंपन्यांच्या हिजाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे लोकांचा विमा क्षेत्रावरील विश्वास उडेल व विम्याची मूळ संकल्पनाच नष्ट होईल. यामध्ये बदल न झाल्यास सर्वेक्षकांची संघटना न्यायालयात जाईल, असा इशाराही या संघटनेने दिला आहे.देशात १५ हजार मान्यताप्राप्त सर्वेक्षक असून जळगाव व खान्देशात ३० सर्व्हेक्षक आहेत. हे सर्वजण या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे संघटनेचे प्रमोद पाटील, पी. के. राठी, शरद पाटील, राजेश झवर, यासेर अरफात, ललित मालपाणी, दिपक अट्रावलकर, अमोल पिंगळे यांनी कळवले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव