बहुआयामी महासत्ता होण्याची भारताची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 21:19 IST2021-01-15T21:18:54+5:302021-01-15T21:19:04+5:30

डॉ. ज्ञानेश्वर मुळे : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त व्याख्यान

India's ability to become a multifaceted superpower | बहुआयामी महासत्ता होण्याची भारताची क्षमता

बहुआयामी महासत्ता होण्याची भारताची क्षमता

जळगाव : बहुआयामी महासत्ता होण्याची भारताची क्षमता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि माजी सनदी अधिकारी व राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ह्यमहासत्ता भारत : वर्तमान कि भविष्यह्ण या विषयावर व्याख्यान पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. मुळे पुढे म्हणाले की, भारत इतिहासातील एक महासत्ताच होता. केवळ आर्थिकच नव्हे तर जीवनाच्या विविध क्षेत्रांत भारतीयांचे प्रभावी योगदान राहिले आहे. सद्य:स्‍थितीत भारतीयांच्या कर्तृत्वाचा प्रभाव जगातील विविध देशांमध्ये दिसून येतो. क्षेत्रफळ, लोकसंख्या, सामाजिक सक्षमता या सर्व आपल्या जमेच्या बाजू आहेत. भारतीय संविधान आपणास महासत्ता कसे बनायचे, याचे मार्गदर्शनही करते. स्वतंत्रता, समता, न्याय व सुशासन या चतु:सूचीच्या आधारे भारतास वाटचाल करत राहावी लागेल, असे त्यांनी सांगितले.

युवक वर्ग जागृत झाला पाहिजे
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहुलीकर यांनी सांगितले की, भारतास जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर सर्वोतपरी प्रयत्न होणे गरजेचे असून त्यासाठी देशातील जनता व युवक वर्ग जागृत झाला पाहिजे. तसेच शैक्षणिक क्षेत्रासोबत विविध संशोधन करून जास्तीत जास्त पेटंट मिळविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, तरच देश येणाऱ्या काळात जागतिक महासत्ता बनू शकतो. प्रास्ताविक विभागाचे प्रभारी संचालक डॉ. मनीष जोशी यांनी यांनी केले, तर सूत्रसंचालन श्याम महाजन यांनी केले. परिचय विद्यार्थिनी शुभांगी केदार हिने केला, तर आभार सुभाष पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश जडे व समाधान अहिरे यांनी परिश्रम घेतले.

 

Web Title: India's ability to become a multifaceted superpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.