संबंधास नकार दिल्याने पत्नीसह तिच्या प्रियकराची मारहाण; पतीची आत्महत्या

By सुनील पाटील | Updated: July 6, 2024 17:17 IST2024-07-06T17:14:27+5:302024-07-06T17:17:19+5:30

विष प्राशन : पत्नी व प्रियकराविरुध्द गुन्हा दाखल.

in jalgaon beating a wife with her boyfriend for refusing to have a relationship husband end her life | संबंधास नकार दिल्याने पत्नीसह तिच्या प्रियकराची मारहाण; पतीची आत्महत्या

संबंधास नकार दिल्याने पत्नीसह तिच्या प्रियकराची मारहाण; पतीची आत्महत्या

सुनील पाटील, जळगाव : घरी येऊन पत्नीशी शारीरीक संबंधाची मागणी करणाऱ्या प्रियकरास नकार दिल्याच्या रागातून पत्नी व तिच्या प्रियकराने पतीला बेदम मारहाण केली. मारहाण व पत्नीच्या अनैतिक संबंधाची गावात बदनामी झाल्याने जबर धक्का बसलेल्या पतीने विष प्राशन करुन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येस कारणीभूत ठरलेली पत्नी व तिचा प्रियकर दोघांविरुध्द जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात मृत तरुणाच्या भावाने तालुका पोलिसात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील एका गावातील तरुण १९ एप्रिल २०२४ ते १६ जून २०२४ या कालावधीत १५ जून रोजी रात्री साडे नऊ वाजता हा दुसऱ्या गावात राहत असलेल्या प्रेयसीच्या घरी गेला. तेथे मृताच्या पत्नीशी शारिरीक संबंधाची मागणी केली. त्यास मयताने नकार दिला असता त्याचा राग आल्याने या तरुणासह मृताची पत्नी या दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे पत्नीच्या अनैतिक संबंधाची गावात चर्चा होऊन बदनामी झाली. या प्रकारातून मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. या प्रकरणी मयताच्या भावाने तक्रार दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ५ जुलै रोजी भादवि कलम ३०६,३२३,५०६, ३४ प्रमाणे मयताची पत्नी व तिचा प्रियकराविरुध्द गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.

दोन दिवस मृत्यूशी झुंज-

पत्नीच्या अनैतिक संबधामुळे गावात बदनामी झाल्याने तरुणाने २ जुलै २०२४ रोजी विष प्राशन केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा सहित कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेचा तपास श्रीकांत ब्रदर करीत आहे.

Web Title: in jalgaon beating a wife with her boyfriend for refusing to have a relationship husband end her life