छत्रपती शिवाजी महाराज व वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन अमित शाह यांचे स्वागत

By विलास बारी | Published: March 5, 2024 05:32 PM2024-03-05T17:32:03+5:302024-03-05T17:32:36+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात युवा संमेलन कार्यक्रमाला महाराष्ट्र गीताद्वारे प्रारंभ झाला आहे.

in jalgaon amit shah was welcomed by presenting the images of chhatrapati shivaji maharaj and veer eklavya | छत्रपती शिवाजी महाराज व वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन अमित शाह यांचे स्वागत

छत्रपती शिवाजी महाराज व वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन अमित शाह यांचे स्वागत

विलास बारी,जळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात युवा संमेलन कार्यक्रमाला महाराष्ट्र गीताद्वारे प्रारंभ झाला आहे. खान्देशवासियांकडून अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज व वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन स्वागत करण्यात आले.

सागर पार्कवर होत असलेल्या युवा संमेलनास अमित शाह यांच्या समवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती आहे. युवा संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देऊन शाह यांचे स्वागत केले. तर जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील व जळगाव शहरचे आमदार सुरेश भोळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली. नंदुरबारच्या खासदार डाॅ.हिना गावित यांनी वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट दिली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी भाषणाला सुरुवात केली.

Web Title: in jalgaon amit shah was welcomed by presenting the images of chhatrapati shivaji maharaj and veer eklavya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.