नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 09:29 PM2019-11-07T21:29:42+5:302019-11-07T21:30:14+5:30

जळगाव : अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट कर्ज माफी देण्यात ...

 Immediate loan waiver to disadvantaged farmers | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या

Next

जळगाव : अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे बुधवारी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून करण्यात आली़ तर नुकसानग्रस्त शेतकºयांनी चक्क पिके सोबत आणून ती अपर जिल्हाधिकारी यांना दाखविण्यात आले़
बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी यांची शिवसैनिकांनी भेट घेतली़ अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून त्वरित पंचनामे करून सरसरकट कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी करीत चर्चा करण्यात आली़ यावेळी उपस्थित शेतकºयांनीही त्यांच्या व्यथा मांडल्या़ नंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ निवेदनात म्हटले की, अवकाळी पावसामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेतकºयांचे अंदाजे ६८००० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे़ ऐन पिक कापणीच्यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकºयाच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला असून तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा़ निवेदन देताना सचिन चौधरी, संजय सोनवणे, रामचंद्र पाटील, रमेश पाटील, जनार्दन कोळी, नरेंद्र सोनवणे, दिलीप जगताप, रावसाहेब पाटील, जितेंद्र पाटील, कमलाकर पाटील, जिजाबराव जाधव, प्रवीण पाटील, संजय पाटील, अ‍ॅड़ दीपक वाघ, पंढरी पाटील आदी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना तात्काळ मदत द्यावी, नुकसानीचे वैयक्तिक स्थरावर पंचनामे न करता सामुहिक पंचनामे करून मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकºयांचे पिक कर्ज माफ करावे, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे निवेदन देवून करण्यात आली आहे़ नुकसानग्रस्त शेतकºयांना सरसकट कर्ज माफी द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानग्रस्त शेतकºयांना तत्काळ सरसकट कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे बुधवारी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून करण्यात आली़ तर नुकसानग्रस्त शेतकºयांनी चक्क पिके सोबत आणून ती अपर जिल्हाधिकारी यांना दाखविण्यात आले़
बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी यांची शिवसैनिकांनी भेट घेतली़ अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून त्वरित पंचनामे करून सरसरकट कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी करीत चर्चा करण्यात आली़ यावेळी उपस्थित शेतकºयांनीही त्यांच्या व्यथा मांडल्या़ नंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ निवेदनात म्हटले की, अवकाळी पावसामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेतकºयांचे अंदाजे ६८००० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे़ ऐन पिक कापणीच्यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकºयाच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला असून तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा़ निवेदन देताना सचिन चौधरी, संजय सोनवणे, रामचंद्र पाटील, रमेश पाटील, जनार्दन कोळी, नरेंद्र सोनवणे, दिलीप जगताप, रावसाहेब पाटील, जितेंद्र पाटील, कमलाकर पाटील, जिजाबराव जाधव, प्रवीण पाटील, संजय पाटील, अ‍ॅड़ दीपक वाघ, पंढरी पाटील आदी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना तात्काळ मदत द्यावी, नुकसानीचे वैयक्तिक स्थरावर पंचनामे न करता सामुहिक पंचनामे करून मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकºयांचे पिक कर्ज माफ करावे, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे निवेदन देवून करण्यात आली आहे़

Web Title:  Immediate loan waiver to disadvantaged farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.