तलाव प्रदूषित करणाऱ्या सांडपाण्याची तत्काळ विल्हेवाट लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST2021-05-26T04:16:23+5:302021-05-26T04:16:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मेहरुण तलाव परिसरातील नागरी वसाहतींचे सांडपाणी तलावात सोडण्यात येत असल्यामुळे, या तलावाचे अस्तित्व नष्ट ...

Immediate disposal of sewage polluting the lake | तलाव प्रदूषित करणाऱ्या सांडपाण्याची तत्काळ विल्हेवाट लावा

तलाव प्रदूषित करणाऱ्या सांडपाण्याची तत्काळ विल्हेवाट लावा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मेहरुण तलाव परिसरातील नागरी वसाहतींचे सांडपाणी तलावात सोडण्यात येत असल्यामुळे, या तलावाचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे वास्तव ' लोकमत ' मधून मांडण्यात येत आहे. या वृत्ताची दखल घेत शहरातील भारती पर्यावरण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापौर जयश्री महाजन यांची भेट घेऊन, मेहरुण तलाव प्रदूषित करणाऱ्या सांडपाण्याची तत्काळ विल्हेवाट लावण्याची मागणी केली. यावर महापौरांनी देखील हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन या पदाधिकाऱ्यांना दिले.

महापौरांनी दिले समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन

भारती पर्यावरण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुजाता देशपांडे, उपाध्यक्ष गणेश कोकाटे, नामदेवराव लाडवंजारी, रवी सानप आदी पदाधिकाऱ्यांनी महापौर जयश्री महाजन यांची भेट घेऊन, सांडपाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. यावर जयश्री महाजन यांनी देखील तलावाच्या या समस्येबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. आपण स्वतः या प्रश्नाकडे लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले.

Web Title: Immediate disposal of sewage polluting the lake