‘त्या’ अधिसूचनेच्या विरोधात आयएमए करणार निदर्शने, आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST2020-12-05T04:25:50+5:302020-12-05T04:25:50+5:30

जळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशनने सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने प्रकाशित केलेल्‍या अधिसूचनेच्या विरोधात लढा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

IMA to stage protests, agitation against 'that' notification | ‘त्या’ अधिसूचनेच्या विरोधात आयएमए करणार निदर्शने, आंदोलन

‘त्या’ अधिसूचनेच्या विरोधात आयएमए करणार निदर्शने, आंदोलन

जळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशनने सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने प्रकाशित केलेल्‍या अधिसूचनेच्या विरोधात लढा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात ८ रोजी निदर्शने व ११ डिसेंबरला कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्‍याची माहिती आयएमएचे सचिव डॉ. स्‍नेहल फेगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयएमएच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेस अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, माजी सचिव डॉ. विलास भोळे, डॉ.राधेश्‍याम चौधरी उपस्‍थित होते. यावेळी डॉ. फेगडे यांनी सांगितले, की सीसीआयएमने २० नोव्हेंबरला काढलेल्‍या अधिसूचनेत आयुर्वेर्दीक पोस्‍ट ग्रॅज्‍युएट डॉक्‍टरांना ५८ शस्‍त्रक्रियांचे प्रशिक्षण देवून रूग्‍णांवर शस्‍त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात जनरल सर्जरी, युरॉलॉजी, पोटाच्या आणि आतड्यांच्या शस्‍त्रक्रिया, नाक-कान-घसा आणि नेत्ररोग शस्‍त्रक्रियांचा समावेश आहे. मुळात वर्षानुवर्षे प्रशिक्षण देवून केल्‍या जाणाऱ्या अत्‍याधुनिक शस्‍त्रक्रियांना सराव न केलेल्‍या अर्धप्रशिक्षित व्यक्‍ती सार्वजनिक आरोग्‍यास धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. यात रूग्‍णांना देखील याचा धोका संभवतो. याला आयएमएचा विरोध असून या विरोधात आयएमएने निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या काळात अत्‍यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे.

Web Title: IMA to stage protests, agitation against 'that' notification